ताज्या घडामोडीपिंपरी
कॅप्रिसिओ सोसायटी येथे प्रभू श्री राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात साजरा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभू श्री राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्त कॅप्रिसिओ सोसायटी येथे उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. यामध्ये मंगल आरती, प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण, महाप्रसाद असे आयोजन करण्यात आलेले होते. यादरम्यान सर्व सोसायटी सभासदांनी एकत्र येत कलश यात्रा देखील काढलेली होती. भगवा रंगाची थीम यावेळेस ठेवण्यात आलेली होती. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविलेला पाहायला मिळाला.
या सोहळ्याचे आयोजन सोसायटी मधील ज्येष्ठ सभासद, श्री.रावलजी, सोनीजी, सोसायटी अध्यक्ष- प्रज्वलजी, अण्णा आहेरेजी, आनंदजी, संदीपजी, इंडीवरजी, गौरव राजपूत यांनी केलेले होते.












