कुलस्वामिनी महिला व बालकल्याण महासंघाची स्थापना

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वसंत सप्तमीच्या शुभ मुहूर्तावर “महिला भगिनींच्या सेवार्थ आणि सक्षमीकरणा करिता ” “कुलस्वामिनी महिला व बालकल्याण महासंघाची” स्थापना (दिनांक 4 फेब्रुवारी 2025) मंगळवार रोजी “कुलस्वामिनी महिला व बालकल्याण महासंघाची” स्थापना करण्यात आली.
यावेळी स्मार्ट सिटी संचालक व मनसे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले, माजी नगरसेविका कमल घोलप, शुभांगी बोऱ्हाडे, राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल शहराध्यक्ष ॲड. संतोष शिंदे आदी उपस्थित होते.
मनसे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महिला भगिनीस मार्गदर्शन करताना सांगितले की, महासंघाच्या माध्यमातून समाजातील अनेक महिलांनी एकत्र येऊन आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सबलीकरणासाठी प्रयत्न करावेत.
मनपा, राज्य सरकारच्या विविध योजनांद्वारे महिलांच्या सबलीकरणासाठी, स्वयंरोजगार निर्मिती करिता संस्थेच्या माध्यमातून प्रयत्नशील राहावे, तसेच कमल घोलप त्यांनी देखील महिलांना मार्गदर्शन करताना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक सबलीकरण प्राप्त करावे समाजाची व कुटुंबाची प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले.













