कुदळवाडी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे फराळ वाटप

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने पंढरीनगरीत जमतात. तसेच महाराष्ट्रातील गावोगावी देखील विविध मंदिरांमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तिभावाने भाविक गर्दी करत असतात.
दिनेश यादव यांनी आजच्या आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी सर्व भाविक भक्तांना, वारकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या.
आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच व
वै ह भ प वामनमहाराज यादव ,कै नथु खंडु यादव,कै बबाबाई नथु यादव,कै सुदाम नथु यादव, गुलाब नथु यादव सेवा संस्था याच्या वतीने कुदळवाडीत पवित्र अशा श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने खिचडी व फराळ वाटप करण्यात आले,
यावेळी सर्व पदाधिकारी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचेआयोजन दिनेश लालचंद यादव सदस्य पिंपरी चिंचवड महानगरपालिका फ प्रभाग अध्यक्ष आमदार पै महेश लांडगे युवा मंच,यांच्या वतीने करण्यात आले होतेअनेक भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.














