Spread the love
आमदार श्री पै महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यावर भर
भोसरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडीमधील वैष्णव रेसीडेन्सी, राँयल प्लाझा, रिगल रेसीडेन्सी, कस्तुरी फ्लोरा, अक्षा एलीगन्स, विस्ता सोसायटी, कुदळवाडी येथे
दिनेश यादव यांनी सदिच्छा भेट देऊन येथील समस्यांची पाहणी केली. येथील रहिवाशांसोबत विविध समस्यांसंदर्भात चर्चा करून त्या सोडविण्यासाठी आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रयत्नशिल असल्याची ग्वाही येथील रहिवाशांना दिली.
यावेळी यादव यांच्यासोबत निलेश नेवाळे, शिवराज लांडगे,अरुण पाडुळे, सुहास ताम्हाणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कुदळवाडी भागात नव्याने विकसीत झालेल्या सोसायटी नव्याने वास्तव करण्यासाठी आलेले नागरिक यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सोसायटी जाऊन बैठक घेऊन नागरिकांशी हितगूज केली.
मोशी परिसरातील विकासकामांमुळे नागरिक समाधानी- दिनेश यादव
मोठ्या प्रमाणात होत असलेले विकास प्रकल्प, विकास आराखडा, नवीन डीपी रस्ते यावर चर्चा करण्यात आली. आरोग्य, स्वच्छता, यावर काय उपयोजना करण्यात आली आहे काय सुधारणा करणार आहोत यांची माहिती दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात सोसायटीधारक उपस्थित होते. भोसरी विधानसभा मतदारसंघात होत असलेला विकास पाहून नागरिक समाधानी आहेत, अशी महिती दिनेश यादव यांनी दिली.
Share.
Leave A Reply

Exit mobile version