कुदळवाडी भागात दिनेश यादव यांचे प्रशासन बरोबर मदत कार्य सुरु

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी विधानसभा क्षेत्रातील ईद्रांयणी नदी काठच्या भागातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना महानगरपालिका पोलीस यांना सांगून सुखरूप बाहेर काढण्यात आमदार श्री पै महेशदादा लांडगे यांना यश आले.
संपुर्ण पिंपरी चिंचवड शहरात पावसाने हाहाकार केलेला असतानाच मावळ तालुक्यात पवना खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने ईद्रांयणी नदी दुथडी भरून वाहत असतानाच दुपारी पालिका प्रशासनास सांगून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना केल्या होत्या.परंतु नदीचे पाणी अचानक मोठ्या प्रमाणात वाढल्याने चिखली भागात नदीकाठच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. घटनास्थळी तात्काळ धाव घेत अग्निशामक विभागास संपर्क करून बोलवून घेतले व नागरिकांना अहवान करण्यात आले.
नागरिकांना पाण्यातून गाडी न चालवण्याचे अहवान केले.नागरिकांना आव्हाहन असेल कि मावळ परिसरात होत असलेली पावसाची तीव्रता पाहता नदीचे पाणी वाढू शकते. जिवापेक्षा काही महत्वाचे नसते त्यामुळे जर नदीचे पाणी वाढत असेल तर सुरक्षित स्थळी जावे किंवा पालिका प्रशासन तसेच आमदार महेशदादा लांडगे हेल्पलाईन व दिनेश यादव जनसंपर्क कार्यालयास संपर्क साधावा साधावा.
या बचाव कार्यावेळी माझ्या समवेत दिपक घन ,ड्रेनेज कर्मचारी, अग्निशमन विभाग ,चिखली पोलीस स्टेशन सोबत होते.














