ताज्या घडामोडीपिंपरीमावळ
किवळे विकासनगर भागामधील लेखाफार्म ते शिंदे पेट्रोल पंप दरम्यान भुयारी मार्ग बांधावा – प्रज्ञा खानोलकर

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – किवळे विकासनगर भागामधील लेखाफार्म ते शिंदे पेट्रोल पंप दरम्यान भुयारी मार्ग बांधावा अशी मागणी प्रज्ञा खानोलकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १६ मधून मुंबई- बंगलोर महामार्ग जातो. मुकाई चौकामधून एक रस्ता एक्सप्रेस वे ला जातो. तसेच एक रस्ता जुन्या मुंबई- पुणे रस्त्याला देहूरोड येथे मिळतो.शिंदे पेट्रोल पंप ते लेखा फार्म दरम्यान नागरिकांची मुख्य रस्ता ओलांडणेची कोणतीही व्यवस्था करणेत आलेली नाही.
लेखा फार्म या ठिकाणी मंगल कार्यालय असलेने त्या ठिकाणी लग्न, स्नेह मेळावे, निरनिराळ्या जातीधर्माचे कार्यक्रम असतात, अशा कार्यक्रमांना माझ्या वार्ड मधील नागरिक जात असतात, परंतु रस्ता
ओलांडण्याची कोणतीही व्यवस्था नसलेने अनेक वेळा अपघात होतात. त्यामध्ये बरेच नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत.लेखा फार्म वरून किवळे-विकासनगर या भागात येणेसाठी मुकाई चौकामधून रस्ता आहे, परंतु तो एक किलोमीटर अंतरावर असलेने व मुकाई चौकामध्ये दररोज वाहतूक कोंडी होत असलेने नागरिक त्या मार्गाचा अवलंब करत नाहीत. ते शॉर्ट कट मार्गाने वाहतुकीचा रस्ता जीव मुठीत धरून ओलांडत असतात. त्यामुळे अपघात
होतात. शिंदे पेट्रोल पंप ते लेखा फार्म दरम्यान भुयारी मार्ग करून देण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे.













