कासारवाडी येथे स्व. प्रा.प्रकाश पगारिया यांच्या 40 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित 40 व्या रक्तदान शिबिरामध्ये 71 जणांचे रक्तदान

कासारवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- येथील पार्श्वनाथ सोसायटीमधील जैन स्थानकामध्ये पार्श्वनाथ युवक मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 1डिसेंबर रोजी स्व. प्रा प्रकाश पगारिया यांच्या 40 व्या स्मृतिदिनानिमित्त चाळीसावे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण 71जणांनी रक्तदान केले.त्यामध्ये जेष्ठ नागरिक श्री. शांताराम जाधव यांनी वयाच्या 68व्या वर्षी ,या शिबिरात 40व्या वेळी रक्तदान केले.
गेली 40 वर्ष पार्श्वनाथ युवक मंडळाच्या वतीने सातत्याने या दिवशी रक्तदान शिबिर घेतले जाते .एकूण 3000 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी आजपर्यंत या शिबिरामध्ये रक्तदान केले आहे.श्री जैन श्रावक संघ आणि पार्श्वनाथ युवक मंडळाच्या वतीने या शिबिराचे आयोजन केले होते.
आधार ब्लड बँकेच्या सहकार्याने हे आयोजन केले .या शिबिराच्या आयोजनासाठी कासारवाडी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया आणि संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पार्श्वनाथ युवक मंडळाच्या युवा सदस्यांनी पुढाकार घेतला. त्यामध्ये विशेष करून राहुल, कल्पेश, मयुर, विपुल,शुभम, जिनेश, ओम पगारिया ,मंगेश बोरा ,दीपेश भंडारी,मानस दुधेडिया, निलय भंडारी ,संदीप कर्नावट,आदिंनी संयोजन घेतले,तर प्रा डॉ अशोककुमार,विलासकुमार पगारिया, संदीप फुलफगर मकरंद शहापुरकर यांचे मार्गदर्शन लाभले.




















