कासारवाडी येथील नेत्र चिकित्सा शिबिरामध्ये 130 जणांची मोफत नेत्र चिकित्सा आणि 90 जणांना चष्मे वाटप

कासारवाडी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी येथे प पू प्रशांत ऋषीजी महाराज साब यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या महर्षी आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने प्रा .डॉ. अशोककुमार पगारिया यांच्या सत्तराव्या जन्मदिनानिमित्त आणि ६९ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जैन स्थानकामध्ये नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये 130 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली आणि 90 जणांना चष्मे वाटप करण्यात आले या शिबिरासाठी नेत्रतज्ज्ञ डॉ एस एस पारख यांचे सहकार्य लाभले.
डॉ. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक संस्थांचे संस्थापक डॉ अशोककुमार पगारिया यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक समाजोपयोगी उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले .त्यांच्या मूळ गावी धामणी या ठिकाणी त्यांच्या परिवाराने खंडेरायाच्या चरणी बैलजोडीचे सुंदर शिल्प अर्पण केले ,त्या शिल्पाचा अनावरण समारंभ सुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून पगारिया कुटुंबीयांच्या हस्ते पार पडला. यावेळी धामणीच्या सरपंच रेश्मा बोर्हाडे, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, देवस्थान कमिटी चे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी पगारिया सरा़चे अभिष्टचिंतन केले कासारवाडी येथील आचार्य आनंद ऋषीची स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आली.
तसेच त्यांचा सन्मान करण्यात आला. चिंचवड येथे विहार सेवा ग्रुपच्या वतीने संदेश गदिया,भद्रएश शहा ,आनंद पगारिया यांनी त्यांचा सत्कार केला! भोसरी येथील स्वस्तिक हॉस्पिटलच्या वतीने सुद्धा डॉक्टर प्रशांत गदिया यांच्या हॉस्पिटलच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमांमध्ये प्रकाश गदिया ज्येष्ठ विनोदी कलाकार बंडा जोशी डॉक्टर विश्वास पाटील आणि प्रा दिगंबर ढोकले यांच्या शुभहस्ते प्रा पगारिया यांचा सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले पगारिया यांच्या केल्या 40 वर्षाच्या विविध क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांचे सर्वच कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्त्यांनी प्रशंसा केली.
रोटरी क्लब अप डायनामिक भोसरीच्या वतीने अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे दीपक सोनवणे रामदास जैन यांनीही त्यांचे अभिष्टचिंतन केले या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये त्यांचे बरोबर त्यांच्या धर्मपत्नी लता पगारिया बंधू विलास पगारिया राहुल कल्पेश मयूर श्रेयस आणि विपुल पगारिया त्यांच्याबरोबर होते पण अशोक पगारिया यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की माझ्या सर्व क्षेत्रातील कार्यामागे कंपनी भक्कमपणाने त्यांचा परिवार नेहमीच उभा असतो साधू संतांचे आणि आई-वडिलांचे आशीर्वाद परिवाराची साथ आणि मित्रांच्या शुभेच्छा आणि सहकार्य ही त्रिसूत्री त्यांच्या यशस्वी सामाजिक जीवनाच्या पाठीमागे आहे असे त्यांनी प्रतिपादन केले समाजातील त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी मित्रांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्यांच्या अभिष्टचिंतन केले













