कासारवाडी जैन स्थानकांमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी येथील जैन स्थानकामध्ये उपप्रवर्तिनी मंगल प्रभाजी म सा मधुर व्याख्यानी डॉ मधुस्मिताजी म सा, मधुर गायिका प पू हर्षिताजी म सा ,आणि प्रखर वक्ता प पू दिव्यांशीजी या साध्वीजी चातुर्मासा निमित्त विराजमान आहेत. त्यांच्या सानिध्यात, आनंद दरबार पगारिया सभागृहामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला .
परिवारातील कासारवाडी येथील अनेक परिवारातील भगिनींना रक्षाबंधन निमित्त आमंत्रित करण्यात आले होते तसेच येथील सुनांच्या बंधूंनाही आमंत्रित करण्यात आले होते .त्यामुळे सभागृहामध्ये कासारवाडी येथील अनेक परिवारांच्या मधील भावांच्या बहिणी आणि येथील सुनांचे भाऊ मोठ्या संख्येने या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी रक्षाबंधन या विषयावर पु मधुस्मिताजी म सा यांचे सुंदर व्याख्यान झाले त्यांनी जैन आगमनुसार रक्षाबंधनाची पार्श्वभूमी आणि इतिहास विशद केला.
रक्षाबंधनाविषयी , भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाविषयी अतिशय सुंदर प्रवचन दिले .कासारवाडी जैन श्रावक संघाच्या वतीने सर्व भगिनींना आरतीची सुंदर थाळी भेट म्हणून देण्यात आली. लकी ड्रॉ मध्ये ज्यांचे नंबर आले अशा पाच भगिनींना अशा पाच भगिनींना चांदीची राखी श्री संघाच्या वतीने देण्यात आली. चांदीच्या राखी पराग कुंकुलोळ या़ंनी दान स्वरूपात भेट दिल्या. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया,पुर्व अध्यक्ष संदीप फुलफगर, महामंत्री पंकज कांकरिया, पंकज कटारिया,मयुर पगारिया ,स्नेहल भंडारी आदिंनी पुढाकार घेतला.









