ताज्या घडामोडीपिंपरी

कासारवाडी जैन श्रावक संघाच्या वतीने वर्षीतप करणाऱ्या तपस्वींचा सन्मान समारोह उत्साहात संपन्न

Spread the love

 

कासारवाडी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – .कासारवाडी येथील जैन स्थानकाजवळील पगारिया सभागृहात बरसा दाता प पु गौतममुनिजी म सा आणि प्रखर व्याख्याता प पू चेतनमुनिजी म सा यांच्या मंगलमय सानिध्यात आठ वर्षीतप तपस्वींचा सन्मान समारंभ शानदार सोहळ्यात संपन्न झाला .

दोन्ही मुनिंनी वर्षीतप या पवित्र तपाचे महत्त्व विशद केले आणि प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान यांच्या 400 दिवसाच्या तपश्चर्येचा पारणा राजा श्रेयांस कुमार यांनी ईक्षु रसाच्या माध्यमातून ‌केला ही वर्षतप पारण्याची पार्श्वभुमी त्यांनी सांगून या साधनेचे महत्त्व विशद केले .

यावेळी वर्षीतप तपस्वी श्रीमती मोतीबाई लुंकड चिंचवड स्टेशन (२६ वे वर्षतप,), सुमनजी गुगळे , सुनीताजी चोरडिया, लताबाई टाटिया, मंगलजी देसरडा, पुष्पाजी शिंगवी, विजयाजी देसरडा आणि भवरलालजी चोरडिया या आठ तपस्वीं चा सत्कार कासारवाडी श्री संघाचे वतीने करण्यात आला.तसेच महाराष्ट्र केसरी व वर्षीतप तपस्वी प पू गौतम मुनींजी यांचाही साधना सदन आणि कासारवाडी जैन श्रावक संघाच्या वतीने ‘आदर की चादर’ समर्पण करून सम्मान करण्यात आला.

यावेळी साधना सदन श्री संघाचे अध्यक्ष विजयकांतजी कोठारी, पन्नालालजी लुनावत, विजय धोका, आदेश खिंवसरा, विजय भटेवरा, नितीन ओस्तवाल तसेच चंदनबाला महिला मंडळाच्या अध्यक्षा सज्जनबाई बोथरा, चंचलबाई कोठारी आणि इतर सदस्या पुण्याहून कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या, तसेच पिंपरी चिंचवड येथील विविध श्री संघांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते, श्री अशोक लु़ंकड, राजेंद्रजी कर्णावट, शिंगवी ,सुरेश धाडीवाल ,जितेंद्र गुगळे, सागर जी सांखला, राजेंद्रजी बाठीया, सुनील जी कोठारी ,पी एम् जैन,संजय बोरा,सागर सांकला , सतीश मेहेर आदी मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थितांची उसाचे (ईक्षु) रसपान, आणि गौतम प्रसादीची व्यवस्था श्री संघाच्या वतीने करण्यात आली . कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री संघाचे माजी अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी संघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया,पंकज कांकरिया ,किरण भंडारी ,मयूर पगारिया ,स्नेहल भंडारी, संदीप कर्नावट , पंकज कटारिया, संदीप फुलफगर ,अमोल मुथा तसेच पार्श्वनाथ युवक मंडळ आणि सुशील बहु मंडळाचे सदस्य आदींनी पुढाकार घेतला, श्रेयस पगारिया यांनी सूत्रसंचालन केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button