Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी काळेवाडी-रहाटणी भागातील मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.

उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ काळेवाडी येथील श्री ज्योतिबाच्या पादुका समोर पत्रकाची पूजा करून व नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. व मतदारांच्या घरोघरी जाऊन पत्रक वाटून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. या वेळी शिवसेना उबाठा गटाचे उपशहरप्रमुख हरेश नखाते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली किरण नढे, आम आदमी पक्षाचे संजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा संतोष मोरे, सुजाता हरेश नखाते, तस्लिम शेख, श्रद्धा शिंदे, अरुणा माने, सुषमा बोरकर, गोरख पाटील, एकनाथ मंजाळ, नरसिंग माने, सावताराम महापुरे, भरत शिंदे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभेत पाठविण्याचा मानस आम्ही सर्वांनी केला आहे. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे‌ शिलेदार आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघात जनजागृती करून मतांची टक्केवारी वाढविणार आहे. मतदारसंघात घरा घरात पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा संदेश आणि “मशाल” चिन्ह पोहचविणार आहोत.

दरम्यान, ही लढाई हुकूमशाही विरोधात लोकशाही अशी असून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राहुल गांधी, शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी मावळ लोकसभेत परिवर्तनाची “मशाल” नक्कीच पेटवणार, असा विश्वास (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख हरेश नखाते यांनी यावेळी या वेळी व्यक्त केला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version