कायद्याच्या अंमलबजावणीसाठी निरंतर लढू – कामगार नेते काशिनाथ नखाते

इंटरनॅशनल हॉकर्स डे उत्साहात साजरा.
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नॅशनल होकर फेडरेशन,महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज देशभरात विविध राज्यात आणि महाराष्ट्रातल्या विविध महानगरपालिका क्षेत्रामध्ये हॉकर्स डे अर्थात फेरीवाला दिवस एकमेकाला मिठाई भरवून शुभेच्छा देत उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील एकूण २८ ठिकाणी शुभेच्छा व कायद्याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, इरफान चौधरी,प्रभाग अध्यक्ष बालाजी लोखंडे,संभाजी, वाघमारे,किरण साडेकर, सुरेश देडे, राजू पठाण,नितिन सुरवसे,अंबालाल सुखवाल,हरी भोई,सागर बोराडे, दादा भानवसे, युनूस पटवेकर,लक्ष्मण मिटकरी,पांडूरंग भोसले,जलाउद्दीन गोलंदाज, प्राविण लोढे, आत्माराम वडदरे,शंकर पवार, मनोज खंडागळे, बालाजी बिजगरे, मोहम्मद शेख, नईम पठाण, अरुण तुपे, विश्वनाथ साळुखे,
इरफान मुल्ला,सुग्रीव नरवटे,यासीन शेख,सागर ठोंबरे,अब्दुल शेख, यांचे सह पदाधिकारी उपस्थित होते.
नखाते म्हणाले की मोठ्या संघर्षानंतर सन २०१४ मध्ये कायदा झाला मात्र त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासन व महानगरपालिकास्तरावर अनास्था असून गोरगरिब, कष्टकऱ्यांच्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून श्रीमंत आणि धनदांडगे यांच्या हिताच्या योजना राबवण्यासाठी सरकारी अधिकारी व राजकीय मंडळी पायघड्या घालत आहेत . आम्ही अनेक पथदर्शी हॉकर्स झोन बनवले आहेत.
पथ विक्रेता कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आम्ही आगृही राहू व त्यांना ओळखपत्र,परवाने,त्याचबरोबर हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीसाठी निरंतर प्रक्रिया सुरू राहणार आहे. शहरातील आणि राज्यातील पथारी, हातगाडी, टपरीधारक भावा बहिणीने मोठी साथ दिली यामुळेच आज फेरीवाल्यांचे प्रश्न विचारात घेतले जात आहेत. यापुढेही आपण संघर्ष सुरू ठेवणार आहोत.













