चिंचवडताज्या घडामोडीपिंपरीसांस्कृतिक
कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट,कलाश्री नृत्यशाला यांच्या वतीने निगडीत अरंगेत्रमचे आयोजन

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट,कलाश्री नृत्यशाला यातून शिक्षण घेतलेल्या गुरु,सायली काने/पवार यांच्या मार्गदर्शनाने हे शिक्षण पूर्ण केलेल्या,
कु.असावारी मधुकर बच्चे,तन्वी राजू कोरे,वरदा जय ताम्हाने,सिद्धी पूनमचंद चोरडीया या मुलींचा अरंगेत्रम् हा कार्यक्रम बुधवार दि 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:00 वाजता ग.दि.माडगुळकर नाट्यगृह प्राधिकरण निगडी येथे आयोजित केला आहे.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक,भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप,आमदार उमा खापरे,भरत नाट्यम कोरोग्राफर अरुंधती पटवर्धन आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहाणार आहेत.
या कार्यक्रमाचा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्तित राहून आनंद घ्यावा असे संयोजकानी आवाहन केले आहे.









