ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्रसांस्कृतिक

कलाकारांना सरसकट एकच श्रेणी मानधन रुपये 5 हजार, अमित गोरखे यांच्या मागणीला यश

Spread the love

सरकाने वाढवला वयोवृध कलावंतांचा सन्मान,

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -राजश्री शाहू महाराज वयोवृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन.”  राज्य शासना मार्फत सन 1954-55 पासून राबविण्यात येते.कलाकारांना सरसकट एकच श्रेणी मानधन रुपये 5 हजार करा अशी मागणी अमित गोरखे यांनी वेळोवेळी सांस्कृतिक मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. आजअमित गोरखे यांच्या सततच्या मागणीला व पाठपुराव्याला यश मिळाले. सांस्कृतिक मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी  मागणी पुर्ण केली.  पिं.चिं मधील कलाकार व साहित्यीकांना याचा फायदा होणार आहे.

आज (दि. 16 मार्च) मंत्रालय येथे कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत महत्वाच्या निर्णयांवर शिक्का मोर्तब झाला. त्यातील महत्त्वाच्या निर्णय म्हणजे ” राजश्री शाहू महाराज वयोवृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन.”  राज्य शासना मार्फत सन 1954-55 पासून राबविण्यात येते. या योजनेतील लाभार्थी हे संपुर्ण पणे कला,साहित्य या क्षेत्राशी निगडीत असुन त्या वर त्यांची उपजीविका अवलंबून आहे  राज्यातील लाखो कलाकार व तसेच जेष्ठ साहित्यिक यांना एकाच श्रेणीत सरसकट पाच हजार रुपये(5,000/) मानधन करण्यात आले. सरसकट एकच श्रेणी सर्व कलाकारांना लागू केल्यास वृद्ध कलाकारांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन जीवनमान उंचावण्यास मदत होईल आशा स्वरुपाची मागणी करण्यात आली होती. त्यांच्या पुढील पिढीस एक आत्मविश्वास निर्माण होऊन लुप्त होत चाललेल्या राज्याच्या काही  संस्कृतीक कलाकृती त्यांचे जतन व संवर्धन करण्यास मदत होइल. या मागणीला गेली अनेक दिवस माझ्या माध्यमातून मी *महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार* तसेच *उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र जी फडणवीस व महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे* यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होतो. अखेर त्या मागणीला यश प्राप्त झाले. पिं.चिं शहर तसेच राज्यात लाखो कलाकारांना व जेष्ठ साहित्यीकांना याचा फायदा होणार आहे. मागच्या सरकारच्या काळात कोरोना सारखी महामारी असताना महाविकास आघाडी सरकारने या सर्व ज्येष्ठ कलाकारांच्या व ज्येष्ठ साहित्यिकांच्या तोंडाला पान पुसणाऱ्या घोषणा फक्त केल्या परंतु महायुतीचे सरकार (भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी) आल्यानंतर या सर्व घोषणा त्यांनी आमलात आणून वयोवृद्ध लोककलावंत व ज्येष्ठ साहित्यिकांना त्यांच्या मानधनात घवघवीत वाढ करून त्यांना सन्मान देण्याचे कार्य या सरकारने केले. तसेच राज्य सरकार या सर्व वयोवृद्ध कलावंत व ज्येष्ठ साहित्यिकांच्या पाठीशी खंबीरपणे आहे असे आश्वासन यावेळेस देण्यात आले.. त्याबद्दल मी *महाराष्ट्र शासन सांस्कृतिक मंत्री श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे* तसेच महायुती (भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी) सरकारचे शतषा आभारी आहे धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button