Spread the love

करंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिरूर दौरा दरम्यान सांसद आदर्श ग्राम करंदी येथे भेट दिली. येथिल गावातील पदाधिकाऱ्यांनी वाजत गाजत स्वागत केले. माता भगिणीकडून औक्षण करण्यात आले. हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आचार संहितेच्या नियमाचे पालन करत हनुमान मंदिराच्या परिसरात कार्यक्रम पार पडले. येथे ग्रामस्थांच्या वतीने आदर सत्कार करण्यात आले. तसेच 80% मताने विजयी करु असे आश्वासन याठिकाणी देण्यात आले. जेष्ठ, तरुण आणि माता भगिनींचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले,  जेव्हा जेव्हा मी इथे आलो तेव्हा तेव्हा आपल्या प्राथमिक गरजा जाणून घेतल्या. आणि ते पूर्ण केल्या जे काही ग्रामस्थांच्या अपेक्षा होत्या ते मी पूर्ण करू शकलो. विकास कामाच्या संदर्भाने अनेक प्रश्न अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामध्ये बैलगाडा घाट आहे त्यावर तातडीने निधी देण्याचा प्रयत्न केला. रस्त्यांची मागणी आहे ती पूर्ण करायची आहे. शाळेची इमारती साठी निधी कमी पडू देणार नाही. युवक खेळाडूसाठी क्रीडा संकुल बांधण्यात यावा यासाठी प्रयत्न चालू आहे.

या प्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर साखर कारखाना वाईस चेअरमन प्रदिप दादा वळसे पाटील, राकाँपा अध्यक्ष मानसिंग भैया पाचुंदकर, उपजिल्हाप्रमुख शिवसेना अनिल काशिद, माजी चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर शंकर जांभुळकर, उद्योजक प्रदीप साकोरे, भाजपा नेत्या जयश्रीताई पलांडे, उपाध्यक्ष भाजपा शिरुर भगवानराव शेळके, अध्यक्ष शिवसेना शिरुर रामभाऊ सासवडे, सभापती पंचायत समिती राजेंद्र राजकर, अध्यक्ष उद्योग आघाडी रविंद्र गायकवाड,करंदी गावातील नागरिक उपस्थित होते.

युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विशाल खरपुडे, युवा सेना जिला चिटणीस वैभव डोकले, शिरूर आंबेगाव मुख्य सलागार एड. कांताराम नपते, शाखाप्रमुख राघू नपते, राष्ट्रवादी पक्ष निरीक्षक भाऊसाहेब डोकले, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष बंटी डोकले, सरपंच करंदी प्रवीण डोकले, माजी सरपंच चेतन भाऊ दरेकर, ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी दगडू डोकले, चेअरमन विकास सोसायटी शरद डोकले तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version