कन्या विद्यालयात पालखी सोहळा संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत आज शनिवार दिनांक 29/07/2024 रोजी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सहशालेय उपक्रमा साठी इयत्ता 5 वी च्या विद्यार्थीनीनी वारकरी वेशभूषा धारण केली होती , 6 वी च्या विद्यार्थिनींनी वृक्षदिंडी, 7 वी च्या विद्यार्थिनींनी ग्रंथदिंडी , व 8 वी च्या विद्यार्थिनींनी वारकऱ्यांची वेशभूषा धारण केली होती . यानंतर विद्यालयाच्या आदरणीय प्रभारी मुख्याध्यापिका सौ ऊर्मिला पाटील यांचे शुभहस्ते वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी व वारकरी दिंडीचे पूजन संपन्न झाले. या कार्यक्रमाचे वेळी विद्यार्थिनींनी पर्यावरण संरक्षण विषयक संदेश व वाचनाचे महत्त्व पटवून देणारे फलक व घोषवाक्य तयार केले होते.
अतिशय भक्तिमय वातावरणात विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विद्यार्थिनींनी गोल रिंगण तयार करून फेर धरला.व त्यानंतर विद्यार्थिनींनी काही अभंगांचे गायन देखील केले. विद्यालयातील सर्व विद्यार्थिनी या कार्यक्रमामध्ये अतिशय उत्साहात सहभागी झाल्या होत्या. यानंतर या दिंडीची पिंपरी नगरीच्या परिसरातून “झाडे लावा , झाडे जगवा”, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” , ग्रंथ हेच गुरू , वाचाल तर वाचाल , विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल ” या नामघोषात मिरवणुक पार पडली.
या कार्यक्रमास विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका उर्मिला पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचेही अनमोल सहकार्य लाभले. व कार्यक्रम संपन्न झाला.












