ताज्या घडामोडीपिंपरी

कन्या विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत आज  आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला.

“योग: कर्मसु कौशलम्” या उक्तीनुसार विद्यार्थीनींचे शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी योग शास्त्रातील आसने व प्राणायाम आवश्यक आहे. यासाठी भारतीय योग संस्था पिंपरी शाखा यांच्या वतीने संजीवनी देशमुख , प्रमिला रासकर, मंगला शेगांवकर, व इतर सदस्य मार्गदर्शक म्हणून विद्यालयात उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या आदरणीय प्रभारी मुख्याध्यापिका  उर्मिला पाटील व भारतीय योग संस्था पिंपरी शाखेच्या प्रमुख  संजीवनी देशमुख व इतर अतिथीगण यांचे  हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले .यानंतर विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका मा. सौ उर्मिला पाटील यांनी जीवनात योग शास्त्राचा अवलंब केल्याने शरीर व मन निरोगी राहते व ध्यानधारणा केल्याने ग्रहण क्षमता वृद्धिंगत होते असे मनोगत व्यक्त केले .

यानंतर पिंपरी शाखेचे गटप्रमुख संजीवनी देशमुख , सदस्य प्रमिला रासकर व इतर सदस्य यांनी विद्यार्थ्यांनी चे अनुलोम विलोम , कपालभाती, भस्त्रिका, या एकाग्रता साधणाऱ्या प्राणायाम प्रकाराबरोबरच पद्मासन, धनुरासन, भुजंगासन, मत्स्यासन ताडासन इत्यादी आसनांचे प्रात्यक्षिक सराव घेतला . यानंतर भारतीय योग संस्थेच्या गट प्रमुख  संजीवनी देशमुख यांनी विद्यार्थी जीवनात योग शास्त्र व निरामय आरोग्य याविषयी माहिती दिली. यावेळी भारतीय योग संस्थेचे  प्रमिला रासकर  मंगला शेगावकर,  आरती मानकर , अश्विनी दवनी, मीना कदम,  पार्वती जोशी,  अश्विनी कोंढाळकर, सुजाता इंगळे,  जयश्री बानेकर , इत्यादी योग शिक्षिका व सर्व अध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योग शिक्षिका सौ प्रमिला रासकर यांनी केले. व उपशिक्षिका सौ रंजना धामणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button