औद्योगिक कामगारांसाठी भाडेतत्वावर घर योजना स्वागतार्ह – संदीप बेलसरे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २३ जुलै रोजी केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला. उद्योजकांच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प कभी खुशी कभी गम देणारा असल्याचे पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी प्रतिक्रिया दिली.
प्राप्तिकर दरात केलेले बदल स्वागतार्ह पण करमुक्त मर्यादा ५ लाख करायला हवी होती. मुद्रा कर्ज योजनेची मर्यादा १० लाख नी वाढवून २० लाख केली स्वागतार्ह पण गरजूंना बॅंकेनी कर्जवाटप केले पाहिजे.
पंतप्रधान क्रेडिट गारंटी योजनेत यंत्र खरेदीसाठी १०० कोटी विनतारण कर्ज स्वागतार्ह पण सध्या ५ कोटी विनतारण कर्ज गरजूंना तारण ठेवल्याशिवाय बँक देतच नाही. बँकांना सरकारने कडक आदेश द्यावेत.अडचणीत असलेल्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी नवे पतपुरवठा धोरण जाहीर केले आहे पण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित करून त्याचा लाभ उद्योजकांना मिळावा याबाबत दक्षता घ्यावी
राष्ट्रीय औद्योगिक विकास कॉरीडॉर अंतर्गत १२ नवीन औद्योगिक पार्क्स ची घोषणा स्वागतार्ह. यातील २ पार्क तरी पिंपरी व चाकण परिसरात विकसित करावेत. सीडबी च्या २४ नवीन शाखांची घोषणा.बंद असलेली यंत्र सबसिडी परत चालू करण्याबाबत घोषणा नाही. कर्जावरील व्याजदर कमी करण्याबाबत घोषणा नाही. msme चे थकीत येणे लवकर वसूल करण्यासाठी नवीन कायद्याची घोषणा पण अंमलबजावणी योग्य पधतीने करावी लागेल. औद्योगिक कामगारांसाठी भाडेतत्वावर घर योजना स्वागतार्ह.













