ओवीजीएफ फौंडेशनच्या तर्फे पारंपारिक संस्कृतीचा जागर

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगतगुरु संत तुकाराम महाराज व शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन पुण्यभुमित भक्तीशक्ती निगडी येथे ७८ व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने आमच्या OGW FOUNDATION अंतर्गत २५ महिला व मुलींचा पारंपारिक पोशाखामध्ये ध्वज वंदना करत देशभक्तीपर गितांवर लेझीम पथकाने लेझीम नृत्य सादर केले .
यावेळी संस्थेच्या फाउंडर अध्यक्षा डॉ. रेखा भोळे म्हणाल्या की आपण शहरात आपली मुलं इंग्लिश मीडियम मधून शिक्षण घेत असताना काळाच्या ओघाने आपली पारंपारिक संस्कृती व पोशाख विसरत चाललेले आहोत त्यासाठी OGWF च्या माध्यमातून आमच्या संस्थेशी जुळलेल्या सर्व महिला भगिनीं या कार्यक्रमा अंर्तगत संस्कृती जोपासण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहोत.
यामध्ये गोरी सरोदे, विभावरी इंगळे, किरण चौधरी, धीरज नारखेडे, शरद नारखेडे, एकनाथ सरोदे,श्री मोहन भोळे यांचे तसेच यात सादरीकरण करणाऱ्या सर्व महिला भगिनींचे नेहमीच संस्थेला मोलाचे योगदान मिळत असते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल OGW फाउंडेशन नेहमीच आपले ऋणी राहील,
धन्यवाद,🙏













