ऐतिहासिक शौर्यभूमी भीमा कोरेगाव येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पाणी वाटप

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) यांच्या वतीने काल (दि १) भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभास मानवंदना देण्यास येणाऱ्या नागरिकांना मोफत पाण्याचे वाटप केले केले.
एक जानेवारी दिवशी संपूर्ण देशातील लाखोंच्या संख्येने लोक ऐतीहासिक शौर्य भूमीतील विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगाव येथे दरवर्षी येत असतात.
समतेची न्यायाची लढाई म्हणून भीमा कोरेगावचे युद्ध इतिहासात अजरामर आहे. शूरवीरांच्या त्यागपूर्ण धाडस, अविचलधैर्य, शौर्यपूर्ण कृतीला क्रांतिकारी मानवंदना देण्यासाठी लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
साहजिकच छोट्या जागेत हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थितिमुळे प्रशासनावर देखील ताण तणाव येतो. लोकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रशासनास हातभार लागावा तसेच लोकांची सेवा करता यावी या उद्देशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवक शहराध्यक्ष इम्रान भाई शेख यांच्या सुचने नुसार.
शहर उपाध्यक्ष विकास कांबळे यांच्या पुढाकाराने कोरेगाव भीमा येथे आलेल्या भीम अनुयायांना तब्बल दीड हजार पाण्याच्या बाटल्यांचा वाटप करण्यात आले.
यावेळी रहाटणी प्रभाग अध्यक्ष सचिन साळवे,सौरभ कांबळे, सुमित निकाळजे,प्रणव कांबळे,ऋषिकेशकांबळे,अभिजित साळवे,अक्षय कांबळे, प्रतीक साळवे,मयूर खरात, अर्शद शेख, शाहीद शेख व मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी उपस्थित होते.













