ताज्या घडामोडीपिंपरी

‘एमआयटी एडीटी’त रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद

Spread the love

 

कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश तु.कराड यांच्या ५८व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला विद्यार्थी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल १५८ दात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न केला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी यांच्या हस्ते तर कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, सहाय्यक कुलसचिव डाॅ.विशांत चेमटे, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा, डाॅ.श्रीकांत गुंजाळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.विशाल पाटील, प्रा.हनुमंत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
याप्रसंगी बोलताना, डाॅ.पुजेरी यांनी म्हटले की, प्रा.डाॅ.कराड यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विश्वराज बागेत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही अनेक उपक्रमांद्वारे साहेबांचा वाढदिवस साजरा झाला. बुधवारी(ता,१७) सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी स्वयंस्पूर्तीने शिबिरस्थळी दाखल होत, रक्तदान केले. त्यामधून तब्बल १५८ रक्त पिशव्या संकलित झाल्याचे कौतुक आणि तितकाच आनंद आहे.
चौकट
बायोगॅस युनिटचेही उद्घाटन
प्रा.डाॅ.कराड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यापीठ आवारात प्रत्येकी २० किलो अन्न कचऱ्यापासून २५०० लिटर बायोगॅस क्षमता असणाऱ्या तीन युनिट्सचे उद्घाटन करण्यात आले. आता या कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून दररोज ५ तास शेगडी चालू शकेल इतका गॅस तयार होणार आहे. ज्या माध्यमातून तब्बल ६ मेट्रीक टन कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे. तसेच, या माध्यमातून तयार होणाऱ्या गॅसचा वापर विद्यापीठाच्या स्वयंपाकघरासाठी होणार असल्याची माहिती, विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ.चोपडे यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button