उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे तिरंगा सन्मानार्थ सायकल रॅली

स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने उन्नती सखी मंचची देखील स्थापना
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर स्थित उन्नती सोशल फाउंडेशन व इंडो ॲथलेटिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा सन्मानार्थ सायकल रॅली २०२४ आयोजित करण्यात आली. पर्यावरण संवर्धन जागृतीसाठी यंदाच्या वर्षाची थीम ‘पेडल फॉर ग्रीन इंडिया’ ही होती. या अंतर्गत , स्पर्धकांना पर्यावरण संवर्धनासाठी सीड बॉल चे वाटप करण्यात आले.
या सायकल रॅलीचा प्रारंभ उन्नती सोशल फाउंडेशन येथून करण्यात आला. उन्नती सोशल फाऊंडेशन कार्यालय -मुकाई चौक रावेत आणि उन्नती सोशल फाउंडेशन कडे समारोप संपन्न झाला. एकूण १००० स्पर्धकांनी या सायकल रॅलीसाठी सहभाग नोंदवला. सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट , ट्रॉफी , ई प्रमाणपत्र , बियाणे किट , ब्रेकफास्ट , बिब नंबर इत्यादी बाबी पुरविण्यात आल्या. तसेच , लकी सहभागींसाठी ३ सायकल , १२ हेल्मेट , ४ सरप्राईज भेटवस्तू आणि विशेष आकर्षक भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
सकाळी ७:३० वाजता मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून , सुरुवात करण्यात आली. भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आणि चिंचवड विधानसभेच्या आमदार आश्विनी जगताप यांची प्रमुख उपस्थिती या रॅलीला होती.
तिरंगा सन्मानार्थ सायकल रॅली सोबत , महिलांच्या सक्षमीकरणासाठी उन्नती सोशल फाऊंडेशनची महत्वकांक्षी संकल्पना असलेल्या ‘उन्नती सखी मंच’ चा शुभारंभ आमदार अश्विनी जगताप यांच्या शुभहस्ते , ‘उन्नती सखी मंच’च्या लोगो चे अनावरण करून आणि सदस्य महिलांसाठी मेम्बरशीप कार्ड वाटप करून करण्यात आला.
उन्नती सखी मंच अंतर्गत सदस्य महिलांसाठी , पिंपळे सौदागर , राहटणी परिसरातील दुकाने, हॉस्पिटल्स, केकची दुकाने आणि पार्लर सलूनमध्ये , ऑटो गॅरेज इ. मध्ये सवलत प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे ; गिफ्ट हँम्पर , सवलतीच्या दरात वैद्यकीय तपासणी , मुलांसाठी कार्यशाळा , संगीत नृत्य वर्ग , सहलींच्या तिकिटात सवलत , वर्क फ्रॉम पध्दतीने नोकरीच्या असणाऱ्या संधी यांची माहिती प्रदान केली जाणार आहे.
प्रास्ताविकात उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या , “पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हर-घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्यासाठी आम्ही तिरंगा सन्मानार्थ रॅलीचे आयोजन करत असतो.यंदाचे रॅलीचे दुसरे वर्ष संपन्न होत आहे. पर्यावरण संवर्धन जागृतीसाठी पेडल फॉर ग्रीन इंडिया ही संकल्पना आम्ही राबवत आहोत. त्याचप्रमाणे महिलांच्या भाव-विश्वाला व्यासपीठ मिळावे यासाठी आम्ही सर्वांनी मिळून उन्नती सखी मंच सुरू केला आहे. त्याचा लाभ परिसरातील महिलांनी घ्यावा असे आवाहन करते.”
याप्रसंगी , प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले , उन्नती सोशल फाऊंडेशनचा प्रत्येक उपक्रम हा नाविन्यपूर्ण असतो. काही महिन्यांपूर्वी त्यांनी दिव्यांग वधू-वरांचे विवाह सोहळे संपन्न केले. आत्ता उन्नती सखी मंच सारखे महिलांच्या सक्षमीकरण आणि एकत्रीकरणाचे मॉडेल उभे राहत आहे. आपल्या प्रत्येकासाठी स्वातंत्र्यदिन खास असतोच , मात्र उन्नती सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने गेल्या वर्षी पासून संपन्न होणारी तिरंगा सन्मान सायकल रॅलीमुळे आरोग्य संवर्धना सोबतच पर्यावरण संवर्धन देखील साधले जात आहे याचा विशेष आनंद आहे. उन्नती सोशल फाऊंडेशन आपल्या प्रत्येक सामाजिक उपक्रमांमध्ये असेच अग्रेसर राहोत याच शुभेच्छा व्यक्त करतो.
याप्रसंगी , प्रतिक्रिया व्यक्त करताना चिंचवड विधानसभेच्या आमदार आश्विनी जगताप म्हणाल्या , “उन्नती सखी मंच ही निश्चितच अभिनव संकल्पना आहे. मोठे मोठे मीडिया माध्यम समूह ही संकल्पना त्यांची संसाधने वापरून राबवत असताना , उन्नती सोशल फाऊंडेशन सारख्या सामाजिक संस्थेने हे शिवधनुष्य पेलणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. पिंपळे सौदागर , राहटणी हे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेला भाग आहे. वर्किंग वूमनची संख्या देखील या भागात अधिक आहे. त्यामुळे दैनंदिन घर – ऑफिस – संसार या तिघांमधून महिलांना एक व्यासपीठ म्हणून , उन्नती सखी मंच निश्चितच चांगली कामगिरी बजावेल याबाबत माझ्या मनात शंका नाही. तसेच , पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत , सुरू केलेली तिरंगा सन्मान सायकल रॅली ही दिवसेंदिवस यशस्वी होत जावो या देखील सदिच्छा..!”
याप्रसंगी , उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे , पी.के.इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे , विलास काटे , वाल्मिकी काटे , सहसंपर्क प्रमुख भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश मनोज ब्राह्मणकर, भानुदास काटे पाटिल,संदेश काटे, आनंद हास्य क्लब चे राजेंद्रनाथ जसवाल, शरद कुटे , ऑस्टीन रिऍलिटीचे संचालक राजु भिसे ,उद्योजक राहुल काटे, धनंजय भिसे,जिल्हाध्यक्ष भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ट पिं चिं शहर(जिल्हा) विजय भिसे , उमेश शेलार , विजय बांगरे , गजानन खैरे , प्रदीप टाके संतोष नखाते , दीपक बुरकुल , सुधाकर टिळेकर , अजित गोरे , प्रमोद चिंचवडे , श्रीकांत चौधरी , प्रशांत तायडे , अमित नखाते , श्रेयस पाटील , मदन शिंदे , मारुती विधाते , अविनाश चौगुले , तुषार देशमुख , प्रणय कडू , प्रीतिंदर सहगल , गणेश भुजबळ , अजित पाटील , सुभाषचंद्र पवार , अनिल कुलकर्णी , शकुंतला शिंदे , सखाराम ढाकणे , सुभाष पाटील , विलास जोशी , जयपाल सिदणाळे , अशोक वारकर , अशोक येळमकर , रमेश चांडगे , पत्रकार विजय न्यायाधीश , सतिश पिंगळे , विवेकानंद लिगाडे , प्रा.अनिलकुमार शाह , विजय रोकडे , सुभाष विधाते ,निर्मला कासार , शोभा राजापुरे , विनायक केलो , रमेश वाणी यांच्यासह उन्नती सोशल फाऊंडेशनचे सर्व सदस्य , विठाई वाचनालयाचे सदस्य , जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि पिंपळे सौदागर मधील नागरिक , पदाधिकारी , कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













