उन्नतीची दिवाळी पहाट ठरली सुरमई

पिंपळे सौदागर वासियांनी लुटला विविध गीतांचा आनंद
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आली माझ्या घरी ही दिवाळी…, पाहिले न मी तूला…, दिन दिन दिवाळी… गाई म्हशी ओवाळी… यासह मराठी आणि हिंदी चित्रपटातील अस्सल गीतांनी उन्नती सोशल फाउंडेशनची दिवाळी पहाट सुरमई ठरली.
उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर येथील पिके इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात शनिवारी (दि. 2) स्वरामृत दिवाळी पहाट उत्साहात पार पडली. तर, रविवारी (दि 3) सायंकाळी स्वरामृत दिवाळी संध्या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली.
यावेळी शंकरशेठ जगताप, आमदार अश्विनीताई जगताप, विजयभाऊ जगताप, बाप्पू काटे, निर्मला कुटे, जयनाथ काटे, जगन्नाथआप्पा काटे, मल्हारी कुटे, बाळासाहेब काटे, विजय भिसे, राजू भिसे, भानुदास काटे पाटील, धनंजय भिसे, प्रकाश झिंजुर्डे,अतुल पाटील, अमोल नखाते, विशाल काटे, शंकर चोंधे, विठाई वाचनालय, सर्व हास्य क्लब, ज्येष्ठ नागरिक संघ, सर्व ज्येष्ठ नागरिक ऑल सिनिअर सिटीजन असोसिएशन व पिंपळे सौदागर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आली माझ्या घरी ही दिवाळी.. या सुरेल गीतांच्या सादरीकरणाने स्वरामृत दिवाळी पहाट कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रसिद्ध गायक रविंद्र खोमणे, अश्विनी मिठे, प्रियंका ढेरंगे, अंजली गायकवाड आणि नंदिनी गायकवाड यांनी आपल्या सुरेल आवाजात हिंदी, मराठी हितांचे सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तर, अवधूत गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर गीत गायन करून ऐतिहासिक क्षणांना उजाळा दिला. तर, अभंग रिपोस्ट या सुप्रसिद्ध कार्यक्रमाने स्वरामृत दिवाळी संध्याची सांगता करण्यात आली.












