उद्योगांना नवीन बजेट परंतु मुलामा जुनाच – अभय भोर

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अभय भोर. चौथी औद्योगिक क्रांती पाहता उद्योगांमध्ये ऑटोमेशन रोबोट टेक्नॉलॉजी जागतिक स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी केंद्र सरकार तर्फे तरतूद दिसून येत नाही वास्तविक उद्योगांसाठी तंत्र प्रशिक्षण केंद्र ही मोठ्या प्रमाणात निर्माण करणे गरजेचे होते.
उद्योगांना नवीन बजेट परंतु मुलामा जुनाच
आज 2024 चे बजेट अर्थमंत्री निर्मलाजी सितारामन यांनी जाहीर केले परंतु बजेट पाहता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पूर्णपणे बजेट राबविले जात असल्याचे दिसले या बजेटमध्ये अनेक योजनांचा भडिमार जरी करण्यात आला असला तरी वास्तविक याचा उद्योगांना कोणताही भरघोस असा फायदा दिसून येत नसल्याचे दिसते टॅक्स मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही कमर्शियल गॅसचे दर वाढविण्यात आलेले आहे तसेच राज्यांमध्ये देशांमध्ये बंद पडलेल्या उद्योगांसाठी भरघोस तरतुदीची अपेक्षा औद्योगिक परिसरातून आणि उद्योजकांची होती परंतु बंद पडलेल्या कंपन्यांना कोणतेही आर्थिक पाठबळ दिलेले नसून अनेक बंद पडलेल्या कंपन्या पुनरुभारणी करण्यासाठी पदरी निराशा नवीन रेल्वे कॅरिडोरमुळे पंधरा हजार 454 कोटी दिल्यामुळे अनेक स्टेशन्स पुनरुभारणीसाठी जो निधी देण्यात आला त्यामुळे लघु उद्योगांना मोठ्या प्रमाणात कामाची संधी निर्माण झाली लघु उद्योगांना कामे मिळणार असून त्याबाबत समाधानी इलेक्ट्रिकल वाहनांना प्राधान्य दिल्यामुळे नवीन उद्योग निर्मितीसाठी चालना मिळेल त्यामुळे स्टार्टअप उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे परंतु मुद्रा लोन सारख्या योजना या जुन्याचा असून त्या उद्योगांना मिळत नाहीत बँकांची या योजना राबविण्यासाठी नापसंती असते त्यामुळे सरकारने अनेक योजनांचा भडिमार जरी केला असला तरी वास्तवात या योजना उद्योगांपर्यंत व्यवसायापर्यंत पोहोचत नाहीत हा अनुभव त्याबद्दल कोणतीही नवीन योजना जाहीर केलेली नाही मत्स्य उत्पादकांसाठी भरीव तरतूद आहे त्यामुळे उद्योगांना मत्स्य उद्योगात नवीन संधी महिला उद्योजकांसाठी फक्त योजनाच असून हाताला काम आणि रोजगाराच्या संधी या कुठेच दिसून आले नाही एकंदरीत आजचा अर्थसंकल्प हा कभी खुशी कभी गम या स्वरूपाचा असून त्यामध्ये नाविन्यपूर्वक असं कोणताच उल्लेख केलेला दिसत नाही वास्तविक उद्योग क्षेत्राकडून खूप मोठी अपेक्षा बजेटमध्ये होती कारण देशाचा जीडीपी दर पाहता स्थानिक उद्योगांना प्राधान्य मिळणे हे फार गरजेचे होते परंतु परदेशी उद्योगांना जास्त संधी असून स्थानिक उद्योगांच्या पदरीज निराशा आर्थिक बजेट मध्ये उद्योगांचा बाबतीत कोणतेच गांभीरपणे निर्णय घेतलेले दिसून येत नाही उद्योग क्षेत्रामध्ये कामगारांची कमतरता भेडसावत असून कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत कुशल कामगार निर्मिती केंद्र वाढविणे अपेक्षित आहे तसेच बंद पडलेल्या कंपन्या पुनरुभारणी पुनर्जीवित करणे कंपन्यांना मूलभूत सुविधा मिळणे आणि सुलभ कर्ज पुरवठा या सर्व बाबी या अर्थ बजेटमध्ये संकल्पना दिसून येत नसून त्यामुळे या वेळेचा२०२४ बजेट हा निराशा जनक म्हणता येईल













