उद्यानामधील तुटलेली खेळणी दुरुस्त करा – निखिल दळवी

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उद्यानामधील तुटलेली खेळणी दुरुस्त करणे व मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा उचलून उद्यान साफसफाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना उपशहर प्रमुख निखिल दळवी यांनी उद्यान अधीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक – १५ आकुर्डी पंचतारा नगर मधील पांढरकर उद्यान मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व नारळाच्या झाडाच्या फांद्या तुटून पडल्या आहेत बऱ्याच दिवसान पासून या नारळाच्या झाडाच्या फांद्या व कचरा या उद्यान मध्ये पडून आहे या उद्याना कडे उद्यान विभागाचे लक्ष नाही सदर उद्याना मधील बरीच खेळणी तुटली आहेत एक घसर कुंडी तुटल्या मुळे कडून ठेवली आहे.
सदर उद्यांची दूर अवस्था झाली आहे लहान मुलांना खेळण्या साठी खेळणी नाही अशा भावना लहान मुलं मध्ये आहेत उद्यान मध्ये कचरा साचला असल्या मुळे नागरिक ही उद्यान मध्ये येत नाही खेळण्याची सर्व खेळणी तुटली असल्या मुळे परिसरातील लहान मुलं मध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे लवकरात लवकर उद्याना मधील सर्व खेळणी दुरस्त करावी किंवा नवीन बसवावी उद्यान मधील नारळाच्या झाडाच्या फांद्या व कचरा उचलून उद्यानाची साफसफाई करावी असे ही निवेदनात म्हटले आहे.













