उत्तर भारतीय सभा आणि सार्वजनिक विकास मंच ऐक्याचा धागा बांधण्याचे काम करत आहेत : संजय निरुपम

उत्तर भारतीय स्नेहसंमेलन जल्लोषात आणि उत्साहात
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उत्तर भारतीय सभा व सार्वजनिक विकास मंच पिंपरी चिंचवड शहर कमिटी द्वारा आयोजित उत्तर भारतीय स्नेह संमेलन मोठ्या आनंदात आणि उत्साहात संपन्न झाले.
पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या आश्रमात राहणाऱ्या 21 मुलांना शैक्षणिक साहित्य आणि ब्लँकेटचे मोफत वाटप करण्यात आले.उत्तर भारतीय सभा आणि सार्वजनिक विकास मंच यांच्याकडून विविध क्षेत्रातील 12 उत्तर भारतीयांना गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे:- हॉटेल इंडस्ट्रीमध्ये शिवसागरचे प्रमुख रविजा पुजारी, चित्रपट जगतातील अभिनेता अरुण सिंह (भोजपुरी काका), डॉ. राजेश पांडे, राजेश गुप्ता, अगस्त आनंद, कृष्णा झा, अरविंद पटेल, प्रियांशू आनंद, अभिनेत्री कनक यादव , अंजली सिंह, नीलम प्रियदर्शिनी, सेतू सिंह.सोनाई मंगल कार्यालय, थेरगांव येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. संजय निरुपम (माजी खासदार लोकसभा आणि उत्तर भारतीय सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष), जय प्रकाश सिंह (उत्तर भारतीय सभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, नगरसेविका – सुनिता तापकीर, सविता खुळे, निता पाडाळे, नगरसेवक – चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे, विनायक गायकवाड, बाबासाहेब त्रिभुवन, पिंपरी चिंचवड शहर भाजपा उपाध्यक्ष हरेश तापकीर, सामाजिक कार्यकर्ते- सागर तापकीर सुरेश बारणे, बिरेंद्र सोनकर, काळुराम कवितके, युनुसभाई अख्तर, विश्वनाथ नखाते, अरुण चाबुकस्वार, गोरख पाषाणकर, संदिप गोडांबे, अरुण तांबे, भाजपा महिला अध्यक्ष थेरगांव करिश्मा सनी बारणे, अर्चना मिश्रा, पत्रकार – संतोष मिश्रा, शहाजी लाखे, प्रीती पाठक, रवि पांडे (गिनीज बुक ऑफ लिम्का बॉल बॉक्सिंग), अजित तिवारी (B & J परिवार), सभाजित मिश्रा, इ. उपस्थित होते.
माजी खासदार लोकसभा आणि राष्ट्रीय अध्यक्ष (उत्तर भारतीय सभा) संजय निरुपम यांनी उत्तर भारतीयांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन केले आणि सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरात उत्तर भारतीय समाजाला जोडण्याचे आणि एकतेच्या धाग्यात बांधण्याचे हे काम अतिशय प्रशंसनीय आहे. तसेच नवीन विद्यार्थी व तरुण पिढीला रोजगाराच्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणे हे कार्य अमूल्य आहे.
करिअर मार्गदर्शनाची मोहीम कौतुकास्पद आहे. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक ऐक्याकडे विशेष लक्ष वेधण्यात आले. उत्तर भारतीय सभा आणि सार्वजनिक विकास मंचाच्या संपूर्ण परिवाराला शुभेच्छा आणि प्रोत्साहन देत ते म्हणाले, की आम्ही या शहरात उपजीविकेसाठी आलो आहोत. येथील जनतेने आम्हाला प्रेमाने स्वीकारले आहे, पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या विकासाला साथ देऊया, पुण्याचा विकास झाला तर सर्वांचा विकास होईल आणि सर्वांचा विकास झाला तर उत्तर भारताचा विकास होईल. संपूर्ण उत्तर भारतीय समाज या विकासाच्या प्रवाहात सामील झाल्यामुळे स्वत:चा अभिमान वाटतो आणि पिंपरी चिंचवड विकासात हातभार लागतो.
पिंपरी चिंचवड, पुणे शहर मार्गदर्शक हरेश बाबासाहेब तापकीर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाले.
या कार्यक्रमाचे संचालन उत्तर भारतीय सभा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संतोष ओझा यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम शहर कमिटीच्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. – मुसाफिर गिरी, धर्मेंद्र शर्मा, तहसीन खान, धीरेंद्र शर्मा, आलोक सिंह, पंकज ओझा, पंडित ब्रह्मदेव तिवारी, बिरेंद्र शर्मा, गोकुळ ओझा, रामायण सिंह, रामअशिष साहनी, रमेश पांडे, दिक्षांत देव उपाध्याय, अरुण शुक्ला, दीपक पांडे, अभिषेक ओझा, रजनीश पांडे, राजीव पाठक, रणधीर सिंह, मनन सिंह, रणधीर शर्मा, संतोष भोला ओझा, इत्यादी. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप गोडांबे व अभिषेक भारद्वाज यांनी केले. पंकज ओझा यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या / आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमात हजारो उत्तर भारतीय सहभागी झाले होते.
तुमचा विश्वासू
संतोष ओझा
अध्यक्ष: उत्तर भारतीय सभा (पिंपरी-चिंचवड शहर)
संस्थापक अध्यक्ष: सार्वजनिक विकास मंच













