ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण

‘ई-बाहा एसएई इंडिया २४’ राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईच्या संघाला उपविजेतेपद

Spread the love
इनोव्हेशन आणि डिझाईन श्रेणींमध्ये पटकावले अव्वल स्थान
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नसरापूर तेलंगणा येथे नुकत्याच झालेल्या ‘ई-बाहा एसएई इंडिया २४’ या राष्ट्रीय स्पर्धेत पीसीईटीच्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) टीम रेड बॅरॉन संघाने प्रतिभा आणि नावीन्य दाखवून अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले. टीम रेड बॅरॉन संघाला सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल स्पर्धेचा उपविजेता म्हणून घोषित करण्यात आले.
   डॉ. बी. व्ही. राजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नसरापूर, तेलंगणा, येथे सहा ते नऊ मार्च २४ दरम्यान राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रेड बॅरॉन संघाने ग्रीन एफिशियंट व्हेईकल, डिझाईन आणि इनोव्हेशन श्रेणींमध्ये अव्वल स्थान पटकावले आणि ऑटोमोटिव्ह डिझाईन आणि अभियांत्रिकी क्षेत्रात टिकून राहण्याची आणि सीमा वाढवण्याची क्षमता आणि ग्राउंड ब्रेकिंग सोल्यूशन्स विकसित करण्याची त्यांची वचनबद्धता दर्शविली.
   शिवाय, संघाने सीएई श्रेणीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले, एंड्युरन्स शर्यतीत प्रथम उपविजेते स्थान मिळवले, तसेच कॉस्ट आणि ओव्हर ऑल स्टॅटीक श्रेणींमध्ये तृतीय स्थान प्राप्त केले. या यशामुळे रेड बॅरॉन संघाने उपविजेतेपद पटकावले. कर्णधार वेदांत तारकासे यांच्या नेतृत्वातील संघात कौशल रानडे, सौरभ ठाकरे आणि ओंकार सालोरकर यांच्यासह रेड बॅरॉन संघात विविध विभागातील ४० विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्राध्यापक सल्लागार म्हणून प्रा. उम्मीद शेख यांनी संघाला मार्गदर्शन केले.
  पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. पी. ए. देशमुख, एसडीडब्ल्यू अधिष्ठाता डॉ. पी. आर. काळे यांनी विजयी संघातील विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button