इंद्रायणी नदीवरील पुलाचे कठडे धोकादायक ; पुलाचे दुतर्फा कचऱ्याचे साम्राज्य ; संरक्षक जाळ्या बसविण्याची मागणी

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील चऱ्होली बुद्रुक आणि चऱ्होली खुर्द यांना जोडणारा रस्ता तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखड्यातून विकसित करण्यात आला. मात्र रस्त्याचे रुंदी प्रमाणे रुंदीकरण न झाल्याने रस्त्यावरून बाह्यवळण मार्गावरून रहदारी करणे धोक्याचे झाले आहे. या रस्त्यावरील इंद्रायणी नदीवरील पुलावर शालेय मुलांची वाहतूक करणारी शालेय बसला अपघात झाला.यात सुमारे ७० मुले वाचली. या बाह्यवळण मार्गाचे दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्या ने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. वाहन चालक, नागरिक यांना रहादारित नक मुठीत धरून पादचाऱ्यांना चालावे लागते. या मुळे नागरिकांत नाराजी आहे. तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखड्या अंतर्गत करण्यात आलेल्या बाह्यवळण मार्ग पुला जवळ धोकादायक वळण असून सदरचे वळण कमी करण्यासाठी रस्त्याचे रुंदी प्रमाणे पूला जवळ रस्ता विकसित करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. सदर ठिकाणचा कचरा तात्काळ स्वच्छता मोहीम रोबवून उचलण्याची मागणी जोर धरत आहे.
पुलाचे दोन्ही बाजूला संरक्षक जाळी बसविण्याची आवश्यकता असून नुकत्याच बस ला झालेल्या अपघातात ७० मुलांचे प्राण प्रसंगावधान राखत घेतलेल्या दक्षते मुळे वाचले आहे. अद्याप दुर्घटने नंतर अद्याप ही त्या ठिकाणचे लोखंडी कठडे दुरुस्त करण्यात आले नसल्याने वाहन चालक नागरिक धोकादायक स्थितीत ये जा करीत आहे. या बाह्यवळण मार्गावर खड्यांचे साम्राज्य देखील असून खड्ड्यांमुळे वाहन चालविणे गैरसोयीचे होत आहे. पुलावर माती साचल्याने पावसाचे पाणी साचून रहात आहे. यामुळे ये जा करणारे पादचारी यांचे अंगावर पाणी उडून त्रासदायक झाले आहे. या प्रकरणी तात्काळ पुलाची रस्त्याची दुरवस्था दूर करण्याची मागणी नागरिकांचे वतीने तुकाराम महाराज ताजणे यांनी केली आहे.
या संदर्भात चऱ्होली खुर्द ग्रामपंचायतचे ग्रामविस्तर अधिकारी भाऊसाहेब जगदाळे म्हणाले, पंचायत तर्फे संरक्षक जाळी सह स्वच्छतेचे काम केले जाईल. स्वच्छ भारत उपक्रम अंतर्गत वृक्षारोपण करून रस्त्याचे दुतर्फा स्वच्छता राहील याची ग्वाही त्यांनी दिली.













