ताज्या घडामोडीपिंपरी

आळंदीत माऊलींच्या दर्शनास महिला भाविकांची गर्दी

Spread the love

मकर संक्रांत उत्साहात साजरी ; पुरुष भाविकांना मंदिरात प्रवेशावर मर्यादा

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात मकर संक्रांती निमित्त परिसरातील लाखावर महिला भाविकांनी माऊलींचे मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करत सुवासिनिनी श्रींचे दर्शन घेत ओवसा वाहत एकमेकींना ओवसा देत मंदिर प्रदक्षिणा करीत श्रींचे दर्शन घेतले. मंदिरात प्रथापरंपरांचे पालन करीत श्रीना तिळाचा अभिषेक करण्यात आला. श्रीनां हलव्याचे दागदागिने, लक्षवेधी पुष्प सजावट, वस्त्रालंकार परिधान केल्याने श्रींचे लक्षवेधी रूप सजले होते. वेदमंत्र जयघोषात वेदमूर्तीनी श्रीना अभिषेख, पोशाख केला.

आळंदीतील विविध मंदिरात महिला भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली होती. मंदिर परिसरातील रस्ते महिलांचे गर्दीने फुलले होते. मकर संक्रांत निमित्त परिसरातून आलेल्या छोट्या व्यावसायिकांमुळे रस्त्याचे दुतर्फा दुकाने थाटून व्यवसाय थाटल्याने मंदिर परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते. वाहतूक पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी सुरक्षित मकर संक्रांत निमित्त पोलिस बंदोबस्त आणि सुरळीत वाहतुकीचे नियोजन केले. गर्दी टाळण्यासाठी मंदिर परिसरात वाहन प्रवेश बंद ठेवण्यात आला होता. मंदिर व परिसर, इंद्रायणी नदी घाट, शहरातील मठ, मंदिरे येथे महिला भाविकांनी दर्शनास तसेच ओवसा वाहण्यास आणि वाण देण्यास मोठी गर्दी केली होती. माऊली मंदिरात व्यवस्थापक माऊली वीर यांचे मार्गदर्शनात दर्शन बारीचे नियोजन करण्यात आले. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना सुलभ दर्शनाची सोय करण्यात आली.

आळंदी मंदिर पुरुषांचे दर्शनावर मर्यादा ; पुरुष भाविकांत नाराजी ; पूर्व सूचनेचा अभाव
मात्र यावर्षी ही पुरुष भाविकांना कोणती हि पूर्व सूचना न देता मंदिरात दर्शनास प्रवेश देण्यावर परस्पर मर्यादा आणल्याने अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली. महिलांची गर्दी असली तरी इतर भाविक, नागरिक पुरुषांचे साठी दर्शन बारी वेगळी व्यवस्था करणे गरजेचे असताना आळंदी देवस्थानने मंदिरात पुरुष भाविकांना सकाळी मंदिरात प्रवेश नाकारल्याने पुरुष भाविकांची मंदिर परिसरात गर्दी झाली होती. महिलांचे गर्दीचे नावाखाली पुरुष भाविकांना मंदिरात प्रवेशावर मर्यादा आणून पुरुष भाविकांना श्रींचे मंदिरातील दर्शना पासून वंचित रहावे लागल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या संदर्भात आळंदी देवस्थानने कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना, जनजागृती न केल्याने अचानक मंदिरात पुरुष भाविकांना दर्शन बंद केल्याने दूर वरून आलेल्या भाविकांची गैरसोय झाली. यातून अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली. या मुळे मंदिर परिसरात पुरुष भाविकांची गर्दी झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button