आरपीआय पदाधिकार्यांचा अण्णा बसनोडे यांच्या विजयाचा निर्धार

प्रचारात सक्रीय सहभाग : आकुर्डीतील मतदारांशी साधला संवाद
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी रविवारी (दि.9) सुट्टीच्यादिवशी आकुर्डी व परिसरातील मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या. या प्रचारात महायुतीचा घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट) च्या पदाधिकार्यांनी सक्रीय सहभाग नोंदवत मतदारांना महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी आरपीआयचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, सरचिटणीस दयानंद वाघमारे, कार्याध्यक्ष योगेश भोसले, उपाध्यक्ष संभाजी वाघमारे, उपाध्यक्ष मोहन मस्के, दिनकर मस्के, सचिव बालाजी जाधव, विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सुजित कांबळे, कामगार आघाडीचे अध्यक्ष दुर्गाप्पा देवकर, राजेश बोबडे, सम्राट जकाते, ज्येष्ठ नेते सिद्धार्थ जोगदंड, बापू गायकवाड, रोहन हावळे, भगवान आढाव आदी पदाधिकारी प्रचारात सहभागी झाले होते.
यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर म्हणाले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आरपीआयचे सर्व पदाधिकारी शहरातील तीनही विधानसभा मतदार संघांमधील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारात सक्रीय सहभाग झाले आहेत. महायुतीच्या उमेदवारांना मिळणारा मतदारांचा अभुतपूर्व प्रतिसाद पाहता, शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीनही विधानसभा मतदार संघांमधील महायुतीचे उमेदवार निश्चितपणे विजयी होणार आहेत. यामध्ये आरपीआयच्या पदाधिकार्यांचा सिंहाचा वाटा असणार आहे.













