ताज्या घडामोडीपिंपरी

आय ए एस तर्फे तुळापूर बलिदान स्मरण दीन राईड चे आयोजन, ५५० सायकलपटुंचा सहभाग

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त इन्डो अथलेटिक्स सोसायटीतर्फे नाशिक फाटा ते तुळापूर अशी दरवर्षी घेण्यात येणारी ६० किलोमीटर सायकलिंग राईड चे आयोजन करण्यात येते सदर वर्ष नववे वर्ष आहे , संपूर्ण महाराष्ट्रातून ५५० हून आधीक जणांनी सहभाग घेतला. आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये असणारी अग्रगण्य संस्था इन्डो अथलेटिक्स सोसायटी यांच्यामार्फत दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात आला. सर्व सहभागी सायकल स्वार सोबत सकाळी 5 वाजता भक्ती शक्ती निगडी येथे जमले होते. उद्योजक अण्णारे बिरादार, आयएएस चे गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.

सर्व सभासद भक्ती शक्ती निगडी – नाशिक फाटा – चरोली फाटा – आळंदी – तुळापूर – वढू असा प्रवास करतात. तुळापूर येथील प्रसिद्ध उद्योजक व श्रीनाथ डेव्हलपर चे सर्वेसर्वा श्री खंडूशेठ शिवले यांच्यातर्फे अल्पोपाराचे आयोजन करण्यात आले.

पुणे पिंपरी चिंचवड, उंब्रज, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, नारायणगाव, उदगीर, सोलापूर तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून सायकल प्रेमींनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांना मान वंदना देण्यात आली.
नियोजना मध्ये इंडो ऍथलेटिक सोसायटी चा मदन शिंदे, कैलाश शेट तापकीर, अजित गोरे, अविनाश चौगुले, प्रणय कडू, सुनील चाकू, क्षितिज विधाते, मारुती विधाते, मंदार शेंडे, प्रदीपजी टाके, दादासाहेब नखाते तर गिरिराज उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button