आयुक्तांच्या हस्ते नवनियुक्त पथविक्रेता समिती सदस्यांचा सत्कार

समिती ॲक्शन मोडवर,आचारसंहिता संपल्यानंतर बैठकीचे आयोजन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरात प्रथमच पथविक्रेता समिती पदासाठी निवडणूक घेण्यात आली यामध्ये महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघाचे पॅनल बहुमताने निवडून आले या नवनियुक्त सदस्यांचा सत्कार पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सत्कार करून कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. समिती सदस्यांनी कामकाज सुरू करण्याची मागणी यावेळी केली.
महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघतर्फे कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वातील पॅनल पिंपरी चिंचवड महानगरपालिका पथविक्रेता समिती सदस्यपदी बहुमताने निवडून आले याबद्दल पॅनल प्रमुख काशिनाथ नखाते,सदस्य राजू बिराजदार, सदस्य किरण साडेकर,सदस्य प्रल्हाद कांबळे,सदस्य किसन भोसले, सदस्य अलका रोकडे,सदस्य सदस्य सलीम डांगे हे निवडून आलेबद्दल आज निवडून अलेबद्दल प्राप्त प्रमाणपत्राचा स्वीकार केला सर्व सदस्य यांचे अभिनंदन करत आयुक्तांनी कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राजेश माने, सुरज देशमाने, सलीम हवालदार, बिलाल तांबोळी,वृषाली पाटणे, संभाजी वाघमारे, नंदू आहेर,बालाजी लोखंडे,दत्तात्रय जाधव, इरफान चौधरी,विजय जाधव, रवींद्र गायकवाड, अंबलाल सुखावालआदी उपस्थित होते. आयुक्त म्हणाले सध्या आचारसंहिता सुरू असल्याने बैठक आयोजित करता येत नाही मात्र आचारसंहिता संपल्यानंतर शहर पथविक्रेता समितीची बैठक घेऊन त्यांचे कामकाजास सुरुवात करू करण्यात येईल.
यावेळी सदस्य यांनी सध्या दिवाळी व सणाचे दिवस असल्यामुळे शहरातील विक्रेत्यावरील कारवाई शिथिल करण्यात यावी अशी मागणी केली. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील पथारी,हातगाडी, टपरी ,स्टॉल धारकांनी कप बशी या चिन्हावर शिक्का मारून सहा उमेदवारांना विजयी केले तसेच संगीता शेरखाने यांचा निसटता प्रभाव झाला.
बहुमताने निवडून दिल्याने सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक मतदारांकडून करण्यात येत आहे आमची जबाबदारी वाढलेली असून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही त्यांचे प्रश्न महापालिकेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आणि विक्रेत्यांची फिस् भरून त्यांना प्रमाणपत्र देने प्रक्रिया सुरू ठेवणे त्यांना सोयी पुरवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहू , असा विश्वास पॅनल प्रमुख काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केला.
कोणत्याही प्रकारचा वाद विवाद न करता उत्साही वातावरणात निवडणूक पार पाडले बद्दल सर्व सदस्यांनी मतदार, महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन, निवडणूक विभाग यांचे आभार मानले.













