ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

अन संतापले अंबादास दानवे आयुक्तांवर…..आयुक्तांची मग्रुरी शिवसेना नीट करू शकते

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महानगर पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आज अंबादास दानवे हे पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर होते. महानगर पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर स्थायी समितीच्या हॉलमध्ये पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, महानगर पालिका प्रशासनाने हॉल चे कुलूपच उघडले नाही. दानवे यांना काही मिनिटे तसच थांबावं लागलं. कंटाळून त्यांना तिथून निघून जावं लागलं. यामुळे संतापलेल्या अंबादास दानवे यांनी आयुक्तांची मग्रुरी शिवसेना नीट करू शकते असा इशाराच त्यांनी दिला आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर होते. आकुर्डीत जनता दरबार हि घेतला. मग, महानगर पालिकेत त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मात्र, ठीक चार वाजता अंबादास दानवे हे पत्रकार परिषद घेणार होते. तो हॉलच महानगर पालिका प्रशासनाने उघडला नाही. यामुळं शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची धावपळ झाली. कंटाळून काही मिनिटांनी अंबादास दानवे आणि सचिन अहिर हे पालिकेतून खाली निघून आले. त्यांना पत्रकरांनी गाठून हा प्रश्न विचारल्यानंतर आधी प्रोटोकॉल चा भाग असल्याचं सांगत प्रकरण सावरून घेण्याचा प्रयत्न केला. नंतर मात्र त्यांनी आयुक्तांची ही मग्रुरी आणि मनमानी कारभार लक्षात येतो अस म्हणत शिवसेना नीट करेल असा थेट इशाराच आयुक्तांना दिला. तस ही आम्हाला दरवाजा तोडून बसण्याची सवय आहे असं सचिन अहिर म्हणाले. यामुळे महानगर पालिकेत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button