ताज्या घडामोडीपिंपरी
आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या पिंपळे निलख येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा भागातील नागरिकांच्या सेवेसाठी आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांचे पिंपळे निलख येथे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष विजय कुंभार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी हे कार्यालय सदैव कार्यरत असेल, अशी ग्वाही विजय कुंभार यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र संघटक मा अजित फाटके,युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मयुर दौंडकर,पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, पिंपरी चिंचवड शहाराध्यक्ष चेतन बेंद्रे, संभाजी ब्रिगेडचे सतिश काळे,रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सुर्यकांत सरवदे, अभिजित मोरे ,अमित म्हस्के, वैजनाथ शिरसाट, प्रकाश हगवणे, राज चाकणे,सुनिता काळे,सिता केंद्रे,मारुती कांबळे, शमीमा पाठन, माधुरी गायकवाड,ब्रह्मानंद जाधव, संदीप देवरे, सचिन पवार, दीपक खैरनार व आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी उद्घाटनानंतर रविराज काळे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. हे कार्यालय आपल्या सेवेसाठी सदैव कार्यरत असेल, अशी ग्वाही यावेळी दिली. त्यावर उपस्थित सर्व नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी रविराज काळे यांचे अभिनंदन करुन, त्यांच्या कार्य कुशलतेबाबत समाधान व्यक्त केले.













