ताज्या घडामोडीपिंपरीभोसरी

आमदार लांडगे यांच्या ‘व्हिजन’मुळे समाविष्ट गावांचा सुनियोजित विकास!

Spread the love

 

– ‘हॅट्रिक’साठी जाधववाडीतील महिला भगिनींकडून विजयाचे औक्षण!
– सर्वाधिक ‘लीड’ जाधववाडीतून देण्याचा ग्रामस्थांनी व्यक्त केला विश्वास

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिखली, जाधववाडी भागामध्ये दहा वर्षांमध्ये अंतर्गत रस्त्यांची कामे झाली. विकास आराखड्यातील रस्त्यांना न्याय मिळाला. विद्यार्थ्यांसाठी शाळेची इमारत, पाण्याच्या टाक्या, उद्यान व्यायामशाळा उपलब्ध करून देताना चिखली जाधववाडी भागाचा सुनियोजित विकास होईल याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आले. समाविष्ट गाव म्हणून दुर्लक्षित राहिलेल्या जाधववाडीकरांसमोर विकासाचे व्हिजन’ ठेवले आणि ते पूर्ण केल्यामुळे ग्रामस्थ आमदार महेश लांडगे यांच्या कामाची पोचपावती सर्वाधिक ”लीड” देऊन करतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ जाधववाडी मातोश्री कमानीपासून ते बोल्हाईचा मळा पायी रॅली काढण्यात आली. यामध्ये महिला भगिनींनी आमदार महेश लांडगे यांचे जंगी स्वागत केले. जागोजागी महिला भगिनींकडून आमदार महेश लांडगे यांचे औक्षण केले. औक्षण करताना महिलांच्या चेहऱ्यावर हॅट्रिकचा विजय स्पष्ट दिसत होता. आमदार लांडगे यांचे जाधववाडी येथील ग्रामस्थांनी ढोल लेझीमच्या दणदणाटात स्वागत केले.

यावेळी अनेक ग्रामस्थांनी भावना व्यक्त केल्या. जाधववाडीकरांना 17 एकर गायरान आमदार महेश लांडगे यांनी उपलब्ध करून दिले. त्यामुळे विकास कामे या भागामध्ये होऊ शकली. या गायरानाच्या जागेत तळई उद्यानाचे काम पूर्ण झाले आहे. दोन पाण्याच्या टाक्या बांधल्यामुळे या भागातील पाण्याचा प्रश्न दृष्टिक्षेपात आला. व्यायामशाळा, रामायण मैदान सभागृह, सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांसाठी शाळेची इमारत बांधून तयार झाली. सर्वात मोठी बैलगाडा शर्यत या भागात भरवली गेली . अंतर्गत सिमेंट काँक्रीटचे रस्ते केले गेले. विकास आराखड्यातील रस्त्यांची अंमलबजावणी सुरू आहे. एक प्रकारे सुनियोजित विकास या सर्व कामांमधून झाला आहे. त्यामुळे नागरिकांचा आमदार महेश लांडगे यांच्या कामावर विश्वास आहे. त्यांच्या कामाची पोचपावती जाधववाडीतील ग्रामस्थ सर्वाधिक लीड देऊन करतील असा विश्वास ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला.

महेशदादांमुळे समाविष्ट गावांना विकासाचा अर्थ कळला…
माजी महापौर राहुल जाधव म्हणाले, आमदार महेश लांडगे यांची विजयाची हॅट्रिक यंदा नक्की आहे. गेल्या दहा वर्षात समाविष्ट गावांमध्ये विकासाचे पर्व आमदार लांडगे यांच्या माध्यमातून सुरू झाले आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. विकासकामांच्या माध्यमातून एक प्रकारे दुर्लक्षित राहिलेल्या समाविष्ट गावांना न्याय मिळवून देण्याचे काम आमदारांनी केले आहे. त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना सलग तिसऱ्यांदा विजयी करून नागरिक देणार आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या कामातून समाविष्ट गावांना विकासाचा अर्थ कळाला आहे. याच कामांवर आमदारांना आश्वासक लीड मिळेल, असा विश्वासच नाही तर आमची खात्री आहे, असेही राहुल जाधव यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button