चिंचवडताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

आता माघार नाही म्हणत शत्रुघ्न काटे यांनीही विधानसभेचे फुंकले रणशिंग

Spread the love

पक्षाने न्याय द्यावा असे आवाहन करीत आमदारकी” साठी शत्रुघ्न काटे यांची दावेदारी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यासाठी इच्छुकांनी आपापली तयारी सुरू केली आहे आणि यामध्ये सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे शत्रुघ्न काटे. भारतीय जनता पक्षाचे दोन टर्म नगरसेवक तसेच दिवंगत आमदार स्व.लक्ष्मणभाऊ जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख.शत्रुघ्न काटे यांनीही “आता माघार नाही” असा विश्वास देत रणशिंग फुंकले आहे.

पिंपळे सौदागर येथील बासुरी बँकवेट हॉल याठिकाणी शत्रुघ्न काटे यांची आपल्या कार्यकर्त्यासोबत बैठक संपन्न झाली.यावेळी साधारण २५०० पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते.

चिंचवड विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यासाठी इच्छुकांनी आपापली तयारी सुरू केली आहे आणि यामध्ये सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे शत्रुघ्न काटे.

भारतीय जनता पक्षाचे दोन टर्म नगरसेवक तसेच दिवंगत आमदार स्व.लक्ष्मणभाऊ जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख. परंतु विकासाची दूरदृष्टी असलेल्या शत्रुघ्न काटे यांच्यावर भारतीय जनता पक्षाने सदैव अन्याय केला. दोन वेळेस महापौर तसेच एक वेळा स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी पसंतीचे उमेदवार असतांना देखील त्यांना डावलून दुसऱ्यांना संधी देण्यात आली. तरीही त्यांनी प्रामाणिक तसेच एकनिष्ठ राहून शहरात पक्ष वाढीस आपले योगदान दिले.
परंतु अजून किती काळ पक्ष असाच अन्याय करणार आहे.पक्षाची महत्वाची पदे वर फक्त एकाच घराण्याची मक्तेदारी आहे का? असा प्रश्न सर्व कार्यकर्त्यांच्या मनात आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्त्याने फक्त कर्म करुण फळाची अपेक्षा करू नये का? पक्षाच्या अश्या काही धोरणामुळे पक्षात अंतर्गत नाराजगी वाढली आहे.
परंतु आज शत्रुघ्न काटे यांच्या “बालेकिल्ल्यात” कार्यकर्त्यांनी बापु काटे यांना चिंचवडचे आमदार म्हणून विधानसभेवर पाठवण्यासाठी शंख फुकले असून कार्यकर्त्यांनी शत्रुघ्न काटे यांना विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह धरला आहे. यावेळी शत्रुघ्न काटे यांनीही “आता माघार नाही” असा विश्वास देत रणशिंग फुंकले आहे.
यावेळी पक्षाने जर विश्वासात घेऊन संधी दिली नाही तर लवकरच सर्व कार्यकर्त्यांसह चर्चा करून आपली पुढची रणनीती ठरवणार असल्याचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button