आजचे वृक्षारोपण आणि संवर्धन म्हणजे उद्याच्या पिढीची ऑक्सिजनची सोय – रविराज इळवे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आजचे वृक्षारोपण आणि संवर्धन म्हणजे उद्याच्या पिढीची ऑक्सिजनची सोय असे मत कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी व्यक्त केले.
यावेळी कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे,डॉ.भारती चव्हाण ,वृक्षमित्र अरुण पवार, शिवाजी बुचडे यांनी वृक्ष पुजनाने वृक्षरोपणाची सुरुवात केली. सनफ्लावर पब्लिक स्कूलच्या शाळेतील मुलांनी “वृक्षवल्ली आम्हा सगेसोयरे” असे म्हणत वृक्षदिंडी काढली, झाडे शाळेच्या प्रांगणात आणि आजूबाजूच्या मोकळ्या जागेतही 100 विविध प्रकारच्या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
मंडळाचे कोअर कमिटी सदस्य आण्णा जोगदंड यांनी आपल्या शर्टवर पर्यावरण जनजागृतीचा संदेश लिहीलेला शर्ट घालुन पर्यावरणाचा संदेश दिला.
वृक्षरोपणाच्या वेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कामगार कल्याण आयुक्त म्हणाले कि, आपल्या कुटुंबा प्रमाणे निसर्गावर प्रेम करा, तुकाराम महाराजांनी म्हटल्या प्रमाणे “वृक्षवल्ली आम्हां,सोयरे ,वनचरे”या अभंगाप्रमाणे निसर्गाशी आदराने वागा , सर्वांनी वर्षभर, वृक्ष लागवड व संगोपन आपापल्या परीने चालू ठेवा,आजचे पर्यावरणाचे रक्षण म्हणजे उद्याच्या पिढीसाठी ऑक्सिजनची सोय असे प्रतिपादन कल्याण आयुक्त रविराज येळवे यांनी केले. पालिकेकडून जो भूखंड कामगार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला डॉ. भारती चव्हाण यांच्या माध्यमातून जो मिळाला आहे त्याचे दोन-तीन वर्षात आम्ही विकास करू त्यासाठी निधी आम्ही कमी पडून देणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले.
गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ भारती चव्हाण या वेळी म्हणाल्या कि, प्रत्येक घटकांनी सामाजिक बांधिलकी समजून वृक्षारोपण केले पाहिजे आणि वृक्षरोपण हे फक्त शासनाचेच काम नाही ते आपलेही काम आहे आपल्या कुटुंबासाठी आपल्या वेळातील 50% वेळ पर्यावरणासाठी प्रत्येकाने पर्यावरणासाठी दिला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. कामगार भूषण पुरस्काराची वयोमर्यादा दहा वर्ष आहे ती आपण पाच वर्षे करावे जेणेकरून सर्व गुणवंत कामगारांना नामांकन सादर येतील हा प्रश्न त्यांनी निवेदनातुन त्यांनी कल्याण आयुक्तांना केला त्यावर कल्याण आयुक्तांनी तत्वता मान्यता देऊन प्रयत्न करणार असल्याचे डॉ. भारती चव्हाण यांनी सांगितले आणि हे आयुक्त प्रत्येक कामगारापर्यंत पोचणारे महाराष्ट्रातील पहिले आयुक्त आहेत व सुंदर प्रशासक आहेत असे त्यांचे डॉ.भारती चव्हाण यांनी कौतुक केले. डॉ. भारती चव्हाण यांनी आयुक्ताकडे वाकड,हिंजवडी आणि मारुंजी या गावासाठी वेगळे कामगार कल्याण केंद्र व्हावे अशी मागणी केली.
इयत्ता चौथी वर्गातील विद्यार्थिनी कु. तनुश्री कारकर राज्यस्तरीय फाउंडेशन परीक्षेत पहिली आल्याबद्दल सत्कार मा.कल्याण आयुक्त श्री रविराज इळवे यांच्या हस्ते करण्यात आला.
वृक्षारोपणासाठी सर्व झाडे वृक्षमित्र अरुण पवार यांनी मोफत दिले.
वृक्ष लागवडीमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, सणसवाडी,गुणवंत कामगार मंडळ,मराठवाडा जनविकास संघ, सनफलावर पब्लिक स्कूल,यांच्या संयुक्त विद्यामाने संपन्न झाला.
यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे, मंडळाच्या अध्यक्षा डॉ भारती चव्हाण, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व वृक्षमित्र अरुण पवार, कल्याण सहाय्यक आयुक्त मनोज पाटील, मनपा ड प्रभागाचे आरोग्य आधिकारी शांताराम माने, सनफलावर पब्लिक स्कूलचे संस्थापक शिवाजी बुचडे, एस पी हायस्कूलचे संस्थापक अंकुश बोडके, कामगार कल्याणचे आधिक्षक संजय थोरात, केंद्र संचालक प्रदिप बोरसे , संदिप गावडे, आनिल कारळे ,सुनील बोराडे ,कोअर कमिटी सदस्य आण्णा जोगदंड व तानाजी एकोंडे ,गुणवंत कामगार शंकर नाणेकर,,काळूराम लांडगे, सुरेश कंक ,सुभाष चव्हाण, शामराव तळोले,शिवराज शिंदे ,ज्ञानेश्वर मलशेट्टी ,संदीप रांगोळे,संजय चव्हाण ,रघुनाथ फेगडे ,रवींद्र रायकर,पांडुरंग सुतार, आण्णा गुरव,मुरलीधर दळवी,गणेश गुरव,होते.
.शहराध्यक्ष महमशरीफ मुलानी प्रास्ताविकामध्ये मंडळाने राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संयोजक म्हणून महमशरीफ मुलानी, बाळासाहेब साळुंके, अण्णा जोगदंड,तानाजी एकोंडे महेंद्र गायकवाड ,धुमाळ नंदकुमार,यांनी केले तर सूत्रसंचालन सोमराज नाडे यांनी केले तर आभार सनफ्लावर शाळेचे संस्थापक शिवाजी बुचडे यांनी मानले.














