आकुर्डीत वेळेचे व्यवस्थापन व निर्णय घेण्याची कला या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी या महाविद्यालयातर्फे (दिनांक २८) “वेळेचे व्यवस्थापन व निर्णय घेण्याची कला” या विषयावर शमिका कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे संचालक डॉ. संतोष खलाटे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सौ. कुलकर्णी यांनी जीवनातील वेळेचे महत्व समजून घेऊन वेळेचा सदुपयोग कसा करावा,वेळेचे व्यवस्थापन कसे करावे तसेच आपले निर्णय घेतांना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात,निर्णय क्षमता कशी वाढवावी हे विद्यार्थ्याना उदाहरणांसह सांगितले.यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्साह दर्शवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रथम वर्षाचा विद्यार्थी ऋतीक कांबळे याने केले.कार्यक्रमाचे नियोजन प्रा.अंकिता व्हटकर यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. अजित पतंगे, प्रा. पूजा प्रजापती, प्रा. प्रियांका दोशी,प्रा. अंकिता व्हटकर,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हे उपस्थित होते.




















