आकुर्डीत आर्ट ऑफ लिव्हिंग या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी व कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने एमबीए महाविद्यालयात दिनांक २९/०१/२०२५ रोजी “आर्ट ऑफ लिविंग” या विषयावर श्री.सौरभ रत्नाकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे संचालक डॉ. संतोष खलाटे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी श्री.रत्नाकर यांनी प्राणायाम-योगसाधना याची दैनंदिन जीवनातील गरज सांगून, याचे विद्यार्थी जीवनात होणारे सकारात्मक परिणाम हे विद्यार्थ्याना सांगितले.
यावेळी अनुराधा पोखरकर व हेमंत पवार यांनी योग साधनेचे त्यांना आलेले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्साह दर्शवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी वैभवी अहीवळे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. दिपाली रंधे, विभागप्रमुख, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी यांनी केले. कार्यक्रमासाठी दोन्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हे उपस्थित होते.









