ताज्या घडामोडीपिंपरीभोसरी

‘अल्प इंजिनिअरिंग’ च्या कर्मचाऱ्यांना तब्बल १३ हजारांची पगारवाढ!

Spread the love

चाकण,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना आणि अल्प इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीमध्ये चाकण औद्योगिक पट्टयातील सर्वाधिक वेतनवाढ करार करण्यात आला. अल्प इंजिनिअरिंगच्या कर्मचाऱ्यांना तब्बल १२ हजार ८०० रुपयांची पगारवाढ देण्यात आली. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

चाकण औद्योगिक वसाहातीमधील निघोजे चाकण येथील अल्फ इंजिनीअरिंग प्रा. लि. व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये तिसरा वेतनवाढ करार झाला. यावेळी संघटनेचे प्रमुख सल्लागार  आमदार महेश लांडगे, प्रमुख सल्लागार रोहिदास गाडे पाटील, संघटनेचे  अध्यक्ष जीवन येळवंडे, कंपनीचे डायरेक्टर पियर डिसूजा, प्लॅन्ट हेड विनोद टिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पूर्णत्वास आला  आहे.

करारावरती  संघटनेच्या वतीने सरचिटणीस कृष्णा रोहोकले, उद्योजक राजु बोत्रे, चिटणीस रघुनाथ मोरे, खजिनदार अमृत चौधरी, दत्तात्रय गवारी, प्रशांत पाडेकर, रविंद्र भालेराव, सोमनाथ जानराव, गृपो कंपनीचे युनिट अध्यक्ष संजय पाटील, युनिट अध्यक्ष किशोर गोरखा, उपाध्यक्ष योगेश गाढवे, सरचिटणीस महेंद्र लाड, चिटणीस सुदाम गुळवे, खजिनदार राजेश सिंग, संघटक गणेश पवार, योगेश व्यवहारे,, एच. आर. मॅनेजर गंगाधर लहाने यांनी स्वाक्षरी केल्या आहेत. कामगारानी डीजेच्या तालावर नाचून, पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्येक्त केला.
**

करारामध्ये झालेले ठळक मुद्दे खलीलप्रमाणे..
एकूण पगारवाढ :- १२, ८०१/- ( बारा हजार आठशे एक रुपये), कराराचा कालावधी ०१/१२/२०२२ ते ३०/११/२०२५ या तीन वर्षांचा राहील. मेडिक्लेम पॉलीसी:-  कुटुंबासाठी ३०००००/- रुपयांची पॉलिसी राहणार असून संपूर्ण खर्च कंपनी करणार या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी, मुले यांचा समावेश करण्यात येणार आहे. मृत्यू साहाय्य योजना, ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी, सुट्टया, दिवाळी बोनस, वैयक्तिक कर्ज सुविधा, गुणवंत कामगार पुरस्कार:- प्रत्येक वर्षी एक गुणवंत कामगारांची निवड करून त्यांना प्रत्येकी १००००/- ( दहा हजार) रुपये एवढी रक्कम प्रशस्तीपत्र व ट्रॉफी बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. कॅन्टीन आणि बस सुविधा अशा कामगार हिताच्या मुद्यांचा करारामध्ये समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button