ताज्या घडामोडीपिंपरी
अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये विद्यार्थ्यांनी जाणून घेतले योगाभ्यासाचे महत्त्व

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सांगवीतील अरविंद एज्युकेशन सो सायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, मुख्याध्यापिका आशा घोरपडे, मुख्याध्यापिका नीलम पवार, प्राचार्य शीतल मोरे, मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका प्रिती पाटील, क्रीडा शिक्षिका सुषमा पवार, क्रीडा शिक्षक अक्षय नाईक, भटू शिंदे, तसेच शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
ध्यानधारणेने योगा दिन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सामुदायिक सूर्यनमस्कार, तसेच योगाचे विविध प्रकार, ताडासन, शीर्षासन आदी आसने करून दाखविली. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनीही सर्व योगासने व सूर्यनमस्कार केले. विद्यार्थिनींनी योगा डान्स करत विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढविण्यासाठी शिक्षिका प्रतिभा ओक यांनी ध्यानाचे प्रयोग विद्यार्थ्यांकडून करून घेतले. विद्यार्थ्यांनी संगीतावर विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांकडून एकाग्रता वाढविण्यासाठी प्रभावी ओंकार ध्यान करवून घेतले.
आरती राव म्हणाल्या, की आजच्या धकाधकीच्या युगात योग ही विद्यार्थी व शिक्षकांसाठी काळाची गरज आहे. योगमुळे नकारात्मक भावना, भिती, राग, नैराश्य, चिंता दूर होऊन स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. तुमचे मन शांत, शरीर तंदुरुस्त आणि आत्मा मजबूत बनवा. कारण आरोग्य ही सर्वात मोठी भेट आहे. प्रणव राव यांनी सांगितले, की योगासनाने एकाग्रता, स्मरणशक्ति, विचारांची स्पष्टता वाढते. आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. या संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी योगाची जोड अत्यावश्यक आहे, असा संदेश देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापिका आशा घोरपडे, मुख्याध्यापिका नीलम पवार, पिंकी मनिकम व प्राचार्या शीतल मोरे यांनी योग दिन सादर करण्यामागचा हेतू स्पष्ट करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षिका सुमित्रा कुंभार, ज्योती मोरे, सुषमा पवार, हेमाली जगदाळे, सोनिया गुरूंग यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व विशद केले. शिक्षिका तृप्ती जगताप, लखवीर कौर, अमृता अमोलिक यांनी योगसाधनेमुळे एकाग्रता वाढवण्यासाठी विविध पद्धती करून दाखवल्या.
क्रीडाशिक्षिका सुषमा पवार व क्रीडाशिक्षक अक्षय नाईक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. शिक्षिका दर्शना बारी यांनी सूत्रसंचालन केले.













