ताज्या घडामोडीपिंपरी
अयोध्येतील श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त पिंपळे गुरव येथे दीपोत्सव

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अयोध्या येथे काल श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानिमित्त पिंपळे गुरव येथे दीपमहोत्सव कार्यक्रमाने राजमाता जिजाऊ गार्डन दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले.
पिंपळे गुरव, राजमाता जिजाऊ गार्डन या ठिकाणी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच सामाजिक कार्यकर्ते रमेश काशीद, पोपट जगताप, मधुकर रणपिसे, प्रसाद जाधव रवी धनवडे ,नरेश पवार ,राज जाधव ,कोळी साहेब शशिकांत गायकवाड, अँड रणजीत ढोमसे, रणजित डोमसे, बाळासाहेब देवकर, सुर्य नमस्कार ग्रुप,हास्य क्लबचे सभासद उपस्थित होते.













