चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी
अयोध्या प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि दुर्गा ब्रिगेड तर्फे महाआरती आणि रॅलीचे आयोजन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अयोध्या प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भोसरी एमआयडीसी येथे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि दुर्गा ब्रिगेड तर्फे भव्य महाआरती आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अभय भोर संपर्क कार्यालयात श्रीरामाची आरती घेण्यात आली आरतीला औद्योगिक परिसरातील उद्योजक कामगार आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.
तसेच औद्योगिक परिसरामध्ये उद्योजक आणि कामगार बंधू तर्फे रॅली घेऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाके वाजवून आणि उद्योजक कामगारांनी नाचून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर उद्योजक जसबिंदर सिंग, प्रवीण चव्हाण, जसबाल सिंग, सचिन जाधव , प्रशांत पठारे दुर्गा भोर तसेच अनेक उद्योजक कामगारांचा सहभाग होता.













