अमरधाम स्मशानभूमी निगडी येथे वाढला बकालपणा असून स्वच्छता अभियान राबवा – सचिन काळभोर

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अमरधाम स्मशानभूमी निगडी येथील बकालपणा निर्माण झाला आहे.निगडी अमरधाम स्मशानभूमी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात यावे, अशी मागणी भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी आयुक्तांकडे केली आहे.
निगडी येथील अमरधाम स्मशानभूमी ह्या ठिकाणी गवत झाडे झुडपे वाढली असून त्या ठिकाणी घुशी उंदीर साप वावर वाढला असून अंत्यविधी करण्यासाठी हजारो नागरिक ह्या ठिकाणी रोज येत असून निगडी येथील अमरधाम स्मशानभूमी येथे मच्छर खूप मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्या मुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतआहे.
निगडी येथील अमरधाम स्मशानभूमी येथील स्वच्छता अभियान राबविण्यात यावे ठेकेदार ह्यांना महानगरपालिका लाखो रुपये साफसफाई करण्यासाठी प्रत्येक महिन्याला देत असून ठेकेदार जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य अधिकारी अमरधाम स्मशानभूमी येथील स्वच्छता मोहीम राबवत नाही.
तसेच ठेकेदार अमरधाम स्मशानभूमी येथील गवत व झाडे झुडपे स्वच्छता करत नाही त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी आयुक्तांकडे केली आहे.













