अन्यथा परिसरातील सर्व श्वान पशुवैद्यकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सोडण्याचा ललित म्हसेकर यांचा इशारा
सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मोकाट फिरणारे श्वान प्राणी (मोकाट कुत्रे) यांचा बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा परिसरातील सर्व श्वान प्राणी आपल्या पशुवैद्यकीय कार्यालयात तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अंगावर सोडण्यात येतील, असा इशारा भाजप उपाध्यक्ष सांगवी रहाटणी मंडल ललित म्हसेकर यांनी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मोकाट फिरणारे श्वान प्राणी (मोकाट कुत्रे) यांचा लावकरात लवकर बंदोबस्त यावा अन्यथा परिसरातील सर्व श्वान प्राणी आपल्या पशुवैद्यकीय कार्यालयात तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अंगावर सोडण्यात येतील.
गेले तीन ते चार आठवड्यापासुन परिसरातील ज्येष्ठ नागरीक, लहान मुले व इतर नागरीक जीव मुट्टीत घेऊन जगत आहेत, संपूर्ण परिसरात भिती चे वातावरण झाले आहे, तसेच मोकाट फिरणारे श्वान प्राण्यांचा सामना करत आहेत, यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आहे, आपण प्रशासन जागे होऊन मोकाट फिरणारे श्वान प्राण्यांवर लवकरत लवकर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.




















