चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य आयुक्त अभिमन्यू काळे यांनी केले सर्व केमिस्टना मार्गदर्शन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –   पिंपरी चिंचवड केमिस्ट असो.च्या पुढाकाराने चिंचवड मध्ये सर्व केमिस्टशी जाहीर संवाद साधला.   अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य आयुक्त या पदावर अभिमन्यू काळे  कार्यरत आहेत.अतिशय कर्तव्यदक्ष म्हणून त्यांची महाराष्ट्रात व प्रशासनात ख्याती आहे.

अत्यन्त कर्तव्यदक्ष व प्रमाणिक व जनहिताय अशी त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात अधिकारी अशी ओळख आहे.
नुकताच त्यांनी पुणे जिल्हा दौरा ठेवला होता यातून केमिस्ट लोकांशी संवाद व मार्गदर्शन असा महत्वाचा विषय घेऊन त्यांनी पिंपरी चिंचवड केमिस्ट असो. च्या पुढाकाराने चिंचवड मध्ये सर्व केमिस्टशी जाहीर संवाद साधला.

या आधी असा जनहित असणारा व केमिस्ट थेट संवाद प्रयोग झाला नव्हता त्यामुळे सर्व केमिस्ट कडून अभिमन्यू काळे  कौतुक करून धन्यवाद दिले.
पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसियशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष खिवंसरा यांच्या पुढाकाराने हा अतिशय महत्वाचा आयुक्त व केमिस्ट मुक्त संवाद घडून आणला.

आयुक्त अभिमन्यू काळे पिंपरी चिंचवड केमिस्ट असो वतीने  स्वागत करण्यात आले .या बैठकीत काळे  केमिस्ट बांधवाना मोलाचे मार्गदर्शन केले.

रोजच्या धावपळीच्या दग दगीच्या जीवनातून स्वतःला व कुटुंबाला स्थिर ठेवणे,रुग्णांना उत्तम सेवा कशी देणे,कायदे तंतोतंत पाळून व्यवसाय कसा करावा,केमिस्ट म्हणून लोकांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची आदी अनेक महत्वाच्या विषयावर आयुक्त अभिमन्यू काळे यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी प्रशासनाच्या वतीने जॉइन्ट कमिशनर शाम प्रतापवार,असिस्टंट कमिशनर, गादेवार सर,अन्न औषधे प्रशासन अधिकारी महेश कवटिकवार आदी प्रशासकीय् अधिकारी  उपस्थित होते.

महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे यांनी सूत्रसंचालन केले.

सचिन धोका,चेतन सिंघवी, प्रसाद शितोळे,गणेश धुमाळ,कन्नन नंबियार,अजय दर्डा,संतोष कदम,मधुकर बच्चे , महेंद्र लंभाते,राहुल शेंडगे,राजू बाफणा,पूर्वेश मुथा,गिरीश बाफना,धनेश मुनोत,अतुल शहा, मंदार काकडे,प्रशांत राऊत,पराग शहा, आदी पदाधिकारी व केमिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयकॉन फार्मा संचालक, संतोष कदम यांनी प्रास्ताविक  केले .  केमिस्ट असो माजी अध्यक्ष संतोष खिवंसरा यांनी  आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button