Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहराची संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी या गोष्टींवर आपण पोलिसाना सांगून विशेष लक्ष द्यावे.सर्व पबस् ची माहिती गोळा करावी. अंमली पदार्थ विकणाऱ्यांवर वर आळा घालावा. त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲड संदीप चिंचवडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात  म्हटले आहे की, पुणे शहरामध्ये अनेक पब्झअव्याहतपणे रात्रभर चालू आहेत.त्या बरोबरीने दारू अंमली पदार्थ हुक्का हे देखील आलेच.पोलिस खाते याला मदत करीत आहे.मोठे मोठे राजकारणी आणि गुंड आणि पोलिस अधिकारी अशी भागीदारी काही ठिकाणी असल्याची माहिती बाहेर आम्ही ऐकतो आहे.
खरे खोटे पोलिसाना माहीत आहे.परंतु आपण त्यांना बंद करू शकत नाही असे दिसते आहे कारण पोलिसांनी ठरवले तर हे चालू पण राहू शकत नाही.

बिल्डर,व्यापारी,अधिकारी स्वतः,शिवाय यांची मुले,तसेच बाहेरील राज्यातील सधन कुटुंबातील मुले या ठिकाणी येत असतात त्यामुळे व्यवसाय पण तितकाच मोठा हफ्ते पण तितकेच मोठे मिळत असतील. मोठ्या फाईवस्टार हॉटेल्स मध्ये देखील हे पब्स्चालू आहेत त्याठिकाणी देखील बाहेरच्या देशातील तरुण तरुणी येत असतात तिथेही हीच परिस्थिती आहे.

कायद्याचा धाक राहिलेला नाही.संस्कृती तर खूप लांब पुणे तर शिक्षणाचे माहेरघर संस्कृतीचे शहर कुठे चालले आहे? पुणे शहर मुंबई व्हायला वेळ लागणार नाही असे दिसते आहे.एक्साईज खाते सुद्धा याला जबाबदार आहे असे दिसते आहे. त्यांचे पण नियम धाब्यावर बसवून दारू विक्री चालू आहे.

दारू विक्री अठरा वर्षाच्या कमी व्यक्तींना देण्यात येवू नये.दिल्यास व्यावसायिकावर कारवाई व्हावी.व्यवसाय प्रामाणिकपणे करतात त्यांनाही हफ्ता खोरी पासून वाचवावे, असे ही निवेदनात म्हटले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version