६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे उदघाटन

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२४-२५ आजपासून महाराष्ट्रातील अनेक केंद्रांवर सुरु झाली.पिंपरी-चिंचवड केंद्रावरील ह्या स्पर्धेचे उद्घाटन २६/११/२०२४ ला सायंकाळी ७ वाजता प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे झाले.ह्या प्रसंगी प्रमुख पाहुण्या मा.आमदार सौ.ऊमाताई खापरे, अ.भा.म.ना.प.मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष मा.भाऊसाहेब भोईर,शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी डाॅ.संजीवकुमार पाटील,सेन्साॅर बोर्ड सदस्य रंगकर्मी नरेंद्र आमले,रंगभूषाकार बाळ जुवाटकर,रंगकर्मी माधव जैगळेकर,परिक्षक राहुल वैद्य,मुकुंद मराठे व अनुया बाम उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व नटराजपूजन करुन स्पर्धेचे उद्घाटन झाले.मा.आमदार उमा खापरे व भाऊसाहेब भोईर ह्यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.स्पर्धेचे केंद्र समन्वयक राजेंद्र बंग ह्यांनी ह्यावर्षी केंद्रावर एकूण १७ नाट्यप्रयोग होणार असून आजपासून १२ डिसेंबर पर्यंत रोज संध्याकाळी ७ वाजता प्रयोग होतील असे सांगितले.













