ताज्या घडामोडीपिंपरी

आंतरराष्ट्रीय जिमनॅस्टिक स्पर्धेत चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या श्राव्या काटे हिचे सुवर्ण यश

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बँकॉक, थायलंड येथे २८ ते ३० मार्च दरम्यान पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय जिमनॅस्टिक स्पर्धेत पिंपळे सौदागर, पुणे येथील श्राव्या श्रीकांत काटे हिने उत्तम कामगिरी करीत चार पदके पटकावली. या स्पर्धेत तिने ३ सुवर्णपदक आणि १ कांस्यपदकाची कमाई करीत घवघवीत यश संपादन केले.

या प्रतिष्ठित स्पर्धेत एकूण १० देशांमधील ४३ क्लबांचे ८५० खेळाडू सहभागी झाले होते. श्राव्या हिने ८ ते १२ वयोगटातील आंतरराष्ट्रीय क्लब (लेवल ३) गटात सहभागी होत फ्लोअर, वॉल्टीग टेबल, अनइव्हण बार आणि बॅलसिंग बार या प्रकारात आपले कौशल्य सिद्ध केले. तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला ३ सुवर्ण आणि १ कांस्यपदक मिळाले.

श्राव्याच्या अथक परिश्रम आणि समर्पणामुळे तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या यशाबद्दल क्रीडा प्रेमी आणि जिमनॅस्टिक क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे.हे घवघवीत असे यश चॅलेंजर पब्लिक स्कूल च्या खेळाडूला मिळाले आहे.

शाळेचे संचालक श्री संदीप काटे सर हे स्वतः एक उत्तम खेळाडू आहेत. क्रीडा व खेळ या विषयात ते नेहमी विध्यार्थी व खेळाडूंच्या पाठीशी उभे असतात. मुलांच्या कामगिरीने त्यांनी मुलांना खेळात क्रीडा कार्यमान व खेळात पुढे जाण्यासाठी अधिक सल्ले दिले व मनोबल वाढवले.
तशेच शाळेच्या मुख्यध्यापिका श्रीमती सुविधा महाले मॅडम यांनी देखील मुलांचे कौतुक केले. व श्राव्याला भरभरून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button